धरणांत गतवर्षीपेक्षा दुप्पट पाणी!

By admin | Published: October 26, 2016 01:55 AM2016-10-26T01:55:52+5:302016-10-26T01:55:52+5:30

यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे दुष्काळाने होरपळलेल्या महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला आहे. भूजलपातळीतही लक्षणीय वाढ झाली असून धरणांत गतवर्षीपेक्षा सुमारे

Water reservoir doubled last year! | धरणांत गतवर्षीपेक्षा दुप्पट पाणी!

धरणांत गतवर्षीपेक्षा दुप्पट पाणी!

Next

मुंबई : यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे दुष्काळाने होरपळलेल्या महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला आहे. भूजलपातळीतही लक्षणीय वाढ झाली असून धरणांत गतवर्षीपेक्षा सुमारे दुप्पट पाणीसाठा झाला आहे. यंदा सरासरी ९५.८ टक्के पाऊस झाला. तर धरणांमध्ये सध्या सरासरी ८३.५३ टक्के जलसाठा आहे.
गतवर्षी सरासरीच्या केवळ ६० टक्के पाऊस झाला होता, तर याच सुमारास पाणीसाठा केवळ ४२.४० टक्के एवढा कमी होता. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या विविध कामांमुळे शिवारे जलयुक्त झाली आहेत.
२० जिल्ह्यांत १०० टक्के पाऊस
ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती आणि गडचिरोली या २० जिल्ह्यांत १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला.
सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, सोलापूर, औरंगाबाद, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया आणि चंद्रपूर या १२ जिल्ह्यांत ७६ ते १०० टक्के पाऊस; कोल्हापूर आणि भंडारा जिल्ह्यांत ५१ ते ७५ टक्के पावसाची नोंद झाली. (विशेष प्रतिनिधी)

जलाशयाची स्थिती (कंसात गतवर्षीचा साठा टक्क्यांमध्ये)
मराठवाडा -७७.२५ (५.५३), कोकण - ९३.२२ (५५.४७), नागपूर - ६६.९७ (४३.९९), अमरावती - ७६.२६ (४९.६४), नाशिक - ८८.१७ (४६.५८) आणि पुणे - ८८.८९ (५३)

Web Title: Water reservoir doubled last year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.