मराठवाड्यातील पाणीसाठा तिशीतच, पश्चिम महाराष्ट्रातील धरणे भरली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 03:15 AM2019-08-20T03:15:06+5:302019-08-20T03:15:20+5:30
पुणे : पश्चिम महाराष्ट्र जलसंकटातून आता सावरत असला तरी मराठवाडा व विदर्भाच्या भागात समाधानकारक पाऊस नसल्याने हा भाग कोरड्या ...
पुणे : पश्चिम महाराष्ट्र जलसंकटातून आता सावरत असला तरी मराठवाडा व विदर्भाच्या भागात समाधानकारक पाऊस नसल्याने हा भाग कोरड्या दुष्काळाकडे जाण्याची दाट शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या जोरदार पावसामुळे कृष्णा आणि भीमा नद्यांच्या खोऱ्यातील पर्जन्यछायेच्या भागाला जलयुक्त केले आहे. गोदावरीने औरंगाबाद विभागाची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणात प्राण फुंकले आहेत. जायकवाडीत ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाल्याने मराठवाड्यातील बºयाचशा भागाला दिलासा मिळाला आहे.
राज्यात झालेल्या विषम पावसामुळे पश्चिम महाराष्ट्र ओल्या दुष्काळाला सामोरा जात आहे. पुणे, सांगली, कोल्हापूर व साताºयाला पुराच्या पाण्याचा फटका बसला. भीमा नदीच्या खो-यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तब्बल ११७.४७ अब्ज घनफूट क्षमतेचे राज्यातील सर्वात मोठे उजनी धरण भरले. त्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्याने पाऊस नसतानाही सोलापूर जिल्ह्यात पूर आला. कृष्णा खोºयात झालेल्या पावसामुळे सांगली, कोल्हापूर व साताºयात पुराने थैमान घातले.
विदर्भ मराठवाड्यात पेरणी रखडली
राज्यातील मराठवाडा व विदर्भातही अनेक ठिकाणी पाऊस पेरणी झालेली नाही. मराठवाड्याच्या अमरावती विभागातील मोठ्या प्रकल्पात क्षमतेच्या २९ व औरंगाबादला ४६ टक्के पाणीसाठा आहे. अमरावती विभागातील मोठ्या प्रकल्पांपैकी वाण धरणात २.१९ (७५.८८ टक्के), ऊर्ध्व वर्धा ९.३५ (४७ टक्के), इसापूर ५.०३ (१४. ८ टक्के) टीएमसी पाणीसाठा आहे. औरंगाबाद विभागातील जायकवाडी धरणात ७०.१५ टीएमसी (९१.५१ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे.
गोदावरी खोºयात झालेल्या दमदार पावसामुळे यंदा जायकवाडी धरण भरण्याच्या मार्गावर आहे. येलदरी धरणाची उपयुक्त साठ्याची क्षमता २८.५०, निम्न मनार ४.८८ व निम्न तेरणा धरणाची क्षमता ३.२२ टीएमसी आहे. मात्र धरणांत सध्या उपयुक्त पाणीसाठा शून्य आहे.
१९ आॅगस्ट अखेरचा उपयुक्त
पाणीसाठा टीएमसीमध्ये -
विभाग साठा आजची गेल्यावर्षीची
(टीएमसी) टक्केवारी टक्केवारी
अमरावती २८.३२ २७.८९ ४३.३
औरंगाबाद ७९.५९ ३०.५८ १९.३२
कोकण १०६.७६ ८६.१४ ८९.७५
नागपूर ६३.६८ ३९.१५ ४०.३१
नाशिक १२७.९५ ६०.३५ ५६
पुणे ४५५.४९ ८४.८ ७९.५६
एकूण ८७४.७९ ६०.५८ ५७.९८
भीमा-कृष्णा खोºयातील प्रमुख
धरणातील साठा टीएमसीत
धरण टीएमसी टक्केवारी
कोयना ९४.९३ ९४.८२
धोम १०.९५ ९३.९६
वारणावती २५.५८ ९२.९५
दूधगंगा २२.९५ ९५.७२
ऊरमोडी ९.४० ९७.४२
डिंभे १२.४२ ९९.४३
पवना ८.४६ ९९.४४
मुळशी १८.४६ १००
वरसगाव १२.८२ १००
पानशेत १०.६५ १००
निरा देवघर ११.७३ १००
भाटघर २३.५० १००
वीर ९.३४ ९९.२८
उजनी ५३.५७ १००