शाळांमध्ये पाण्याचा ठणठणाट

By Admin | Published: July 12, 2014 10:13 PM2014-07-12T22:13:11+5:302014-07-12T22:13:11+5:30

पावसाची हुलकावणी : विद्यार्थी संख्या १ लाख ९२ हजार

Water Resolve in Schools | शाळांमध्ये पाण्याचा ठणठणाट

शाळांमध्ये पाण्याचा ठणठणाट

googlenewsNext

धाड : जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक अशा एकूण १ हजार ४४८ शाळा असून जवळपास १ लाख ९२ हजारांवर विद्यार्थी संख्या आहे. या पैकी अनेक शाळांमध्ये पाण्याचा ठणठणाट असल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.
गत दशकात यावर्षी प्रथमच जुलै महिना कोरडा जात आहे. जिल्ह्यात कुठेही दमदार पाऊस नाही. हवेतील आद्र्रता कमी तर उन्हाची तिव्रता अधिक असल्याने उन्हाळ्यापेक्षाही जास्त चटके बसत आहेत. शाळेत बसविण्यात आलेले पिण्याच्या पाण्यासाठी हातपंप कोरडे पडले आहेत. घरुन पाण्याने भरुन आणलेल्या बॉटल शाळेत येईपर्यंतच गरम झाल्यामुळे पाणी पिण्यायोग्य राहत नाही. शाळेतील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या उन्हाळ्यापासून कोरड्या आहेत. काही जि.प.शाळेत असणार्‍या हातपंपाना पाणी असले तरी त्याची पातळी खोल गेल्याने मुलांची झुंबड उडते. अशीच अवस्था माध्यमिक शाळांची असून पाणी आणावे कुठून हा प्रश्न मुख्याध्यापकासमोर उभा आहे. यासाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.

** पोषण आहार योजनेलाही फटका
प्रत्येक शाळेत असलेली पोषण आहार योजनेलाही पाण्याचा फटका बसला आहे. हा आहार शिजवण्याएवढा पाणीसाठा उपलब्ध करुण्याची कसरत मुख्याध्यापकांना करावी लागत आहे.

Web Title: Water Resolve in Schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.