हॉटेल्स-रेस्टॉरन्ट्समध्ये पाणी बचतीचा संदेश
By admin | Published: April 29, 2016 03:20 AM2016-04-29T03:20:26+5:302016-04-29T03:20:26+5:30
राज्यातील ‘दुष्काळदाह’ लक्षात घेऊन हॉटेल अँड रेस्टॉरन्ट असोसिएशन (वेस्टर्न इंडिया) या संघटनेने पाणी बचतीसाठी पुढाकार घेतला आहे.
मुंबई : राज्यातील ‘दुष्काळदाह’ लक्षात घेऊन हॉटेल अँड रेस्टॉरन्ट असोसिएशन (वेस्टर्न इंडिया) या संघटनेने पाणी बचतीसाठी पुढाकार घेतला आहे. या संघटनेशी संलग्न असलेल्या राज्यातील सर्व हॉटेल्स आणि रेस्टॉरन्ट्समध्ये आता पाणी बचतीचे धडे मिळणार आहेत. तसेच, हा उपक्रम महाराष्ट्रासह गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिव-दमण आणि सिल्व्हासा या ठिकाणीही राबविण्यात येणार आहे.
हॉटेल्स आणि रेस्टॉरन्ट्समध्ये पाणी बचतीसाठी अर्धा ग्लास पाणी देणे, अस्पर्शित पाण्याचा पुनर्वापर करणे, पाण्याचा अतिवापर टाळणे, दुष्काळाच्या तीव्रतेविषयी ग्राहकांना दक्ष करणे, नळ व्यवस्थित बंद करणे आणि स्विमिंग पूलचा वापर नसल्यास बाष्पीभवन टाळण्यासाठी पूल झाकून ठेवणे अशी वेगवेगळी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत.
दैनंदिन जीवनात पाणी वाचवून पाणीकपात असताना तो साठा वापरण्यावर सर्व स्तरातून प्रयत्न झाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.