पाणीटंचाईतही सेनेचे मावळे झिंगले

By Admin | Published: June 27, 2014 02:19 AM2014-06-27T02:19:35+5:302014-06-27T09:03:57+5:30

अंबरनाथ पूर्व भाग पाणीटंचाईग्रस्त झाला असतानाही लोकसभा निवडणुकीत मिळविलेल्या विजयी जल्लोषाच्या ओल्या पार्टीत सैनिक झिंगले.

In the water scarcity the army mawn jhangale | पाणीटंचाईतही सेनेचे मावळे झिंगले

पाणीटंचाईतही सेनेचे मावळे झिंगले

googlenewsNext
>अंबरनाथ : चिखलोली धरण पूर्णत: आटल्याने अंबरनाथ पूर्व भाग हा पाणीटंचाईग्रस्त झाला आहे. तर अंबरनाथच्या या संकटाची जाणीव सर्वाना असतानाही लोकसभा निवडणुकीत मिळविलेल्या विजयी जल्लोषाच्या ओल्या पार्टीत बुधवारी  १५ हजारांहून अधिक मावळे व्यस्त होते. 
शहराच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा करणा:या चिखलोली धरणातील पाणीसाठा संपल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. याची कल्पना अंबरनाथच्या सत्ताधारी शिवसैनिकांना आहे. असे असूनही शहरातील शांतीसागर रिसॉर्टमध्ये जंगी पार्टीचे आयोजन केले होते. निमित्त होते कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघात युतीला मिळालेल्या यशाचे. या यशासाठी कार्यकत्र्यानी केलेल्या मेहनतीबद्दल त्यांच्यासाठी खास ओली पार्टी आयोजित करण्यात आली होती.
 विशेष म्हणजे या पार्टीत महिलांना बोलाविण्यात आले नव्हते. या पार्टीसाठी कल्याण आणि भिवंडी मतदारसंघातील 5 हजार कार्यकत्र्याना निमंत्रित करण्यात आले. मात्र ओली पार्टी म्हटल्यावर काम करणारे मावळे आणि न करणारे कावळेही हजर राहिले. त्यामुळे 5 हजारांचा आकडा 15 हजारांवर गेला. नियोजनापेक्षा कार्यकर्ते तिप्पट झाल्याने जेवणाची आणि मदिरेची बोंबाबोंब झाली. ज्यांना मिळाली त्यांनी ती तिथे तर ढोसलीच शिवाय रिकाम्या बाटलीत पेग भरून घरीही नेली. जेवणासाठी कार्यकत्र्याची तुफान गर्दी झाली होती. 
काहींनी तर उपाशीच घरी येणे पसंत केले. त्यातही काही कार्यकत्र्याचा उत्साह एवढा दांडगा होता की, ते दारूसाठी व जेवणासाठी नवा स्टॉक येईर्पयत थांबले होते. अख्खी शिवसेना त्या पार्टीत सामील झाली होती. नागरिकांच्या हिताच्या मुद्दय़ावर राजकारण करणा:या शिवसेनेला आणि त्यांच्या पदाधिका:यांना अंबरनाथकरांची तहान दिसली नाही. 
या पार्टीला आणि सत्कार समारंभाला शिवसेना जिल्हासंपर्क प्रमुख एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कपिल पाटील, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, नरेश म्हस्के, आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्यासह अनेक बडे पदाधिकारी उपस्थित होते. 

Web Title: In the water scarcity the army mawn jhangale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.