मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये तीन दिवसांत महिन्याचा पाणीसाठा

By Admin | Published: July 5, 2016 04:29 AM2016-07-05T04:29:38+5:302016-07-05T04:29:38+5:30

पावसाने शुक्रवार ते रविवार या काळात तलाव क्षेत्रात जोरदार हजेरी लावल्यामुळे अवघ्या तीन दिवसांत मुंबईच्या धरणांमध्ये महिन्याभराचा पाणीसाठा वाढला आहे़ हा साठा एकूण जलसाठ्याच्या

Water storage in three days in Mumbai for water supplying dams | मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये तीन दिवसांत महिन्याचा पाणीसाठा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये तीन दिवसांत महिन्याचा पाणीसाठा

googlenewsNext

मुंबई/ठाणे : पावसाने शुक्रवार ते रविवार या काळात तलाव क्षेत्रात जोरदार हजेरी लावल्यामुळे अवघ्या तीन दिवसांत मुंबईच्या धरणांमध्ये महिन्याभराचा पाणीसाठा वाढला आहे़ हा साठा एकूण जलसाठ्याच्या १५ टक्केच आहे़ मात्र पाणीटंचाईच्या काळात ही वाढही दिलासा देणारी आहे़
जून महिना संपत आला तरी पावसाळी ढग तलाव क्षेत्रात फिरकत नव्हते़ त्यामुळे तलावांची पातळी दिवसेंदिवस खालावत होती़ मुंबईत पाऊस जोरदार असला तरी तलाव क्षेत्र मात्र कोरडेच राहत होते़ मात्र वीकेण्डच्या पावसाने चित्र पालटले.
पाऊस सुरू झाल्यापासून तलाव क्षेत्रातील जलसाठा रोज २० ते ३० हजार दशलक्ष लीटरने वाढला होता़ गेल्या तीन दिवसांमध्ये तलावांत तब्बल एक लाख १७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा वाढला़ यामुळे ३२ दिवसांचा पाणीसाठा तयार झाला. वर्षभर आवश्यक पाण्याच्या तो १५ टक्केच असून, पाणीकपात कायम राहील.
ठाणे-पालघरलाही दिलासा
ठाणे, पालघर जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या क्षेत्रात गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात तिपटीने वाढ झाली आहे. ठाणे जिल्ह्यात धरणांच्या क्षेत्रात गेल्या २४ तासांत ७३७ मिमी पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस सूर्या धरणात, तर सर्वांत कमी पाऊस उल्हास नदीच्या खोऱ्यातील आंध्रा धरणात झाला आहे. बारवी धरणातील साठाही वाढला आहे. (प्रतिनिधी)

- मुंबईला दररोज 3750दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो़. 
- गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यापासून मुंबईत पाणीकपात सुरू झाल्याने रोज ३२५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत आहे़
- मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा होण्यासाठी धरणांमध्ये १ आॅक्टोबरअखेर १४ लाख दशलक्ष लीटर जलसाठा असणे अपेक्षित आहे़


असा वाढला जलसाठा
१ जुलै १ लाख १० हजार
२ जुलै १ लाख १९ हजार
३ जुलै १ लाख ५७ हजार
४ जुलै २ लाख २७ हजार
(दशलक्ष लीटरमध्ये)

Web Title: Water storage in three days in Mumbai for water supplying dams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.