बुलडाण्यातील ६५० गावांवर पाणीटंचाईचे सावट
By admin | Published: February 22, 2017 04:17 AM2017-02-22T04:17:18+5:302017-02-22T04:17:18+5:30
जिल्हा प्रशासनाने २०१६-१७ साठी पाणीटंचाई निवारण आराखडा तयार केला असून
नीलेश शहाकार / बुलडाणा
जिल्हा प्रशासनाने २०१६-१७ साठी पाणीटंचाई निवारण आराखडा तयार केला असून, जिल्ह्यात ६५० गावांत संभाव्य पाणीटंचाई घोषित करण्यात आली आहे. गतवर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला होता.
जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे पाणीपातळी वाढविण्यात प्रशासनाला यश आले होते. मात्र, आॅक्टोबरनंतर अपेक्षित पाऊस न झाल्याने पाणीपातळी खालावली आहे. उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाई निवारण आराखडा तयार केला आहे. त्यानुसार, ६५० गावांत संभाव्य पाणीटंचाई घोषित करून उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. देऊळगावराजा, मेहकर, लोणार, सिंदखेडराजा, शेगाव व जळगाव जामोद सहा तालुक्यातील सर्वाधिक गावे पाणीटंचाईग्रस्त घोषित करण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)