४८६ गावांना ६५४ टँकरने पाणीपुरवठा

By Admin | Published: October 16, 2015 03:53 AM2015-10-16T03:53:54+5:302015-10-16T03:53:54+5:30

पावसाळा संपत नाही, तोच पाणीटंचाईने नागरिकांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. राज्यातील ४८६ गावांसाठी अद्यापही ६५४ टँकरने पाणीपुरवठा सुरू

Water supply to 486 villages of 654 tankers | ४८६ गावांना ६५४ टँकरने पाणीपुरवठा

४८६ गावांना ६५४ टँकरने पाणीपुरवठा

googlenewsNext

संतोष वानखडे, वाशिम
पावसाळा संपत नाही, तोच पाणीटंचाईने नागरिकांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. राज्यातील ४८६ गावांसाठी अद्यापही ६५४ टँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याची नोंद राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या दफ्तरी आहे.
गेल्या तीन वर्षांत पावसाचे प्रमाणही कमी झाल्याने, पाणीटंचाईची तीव्रता अधिकच वाढत आहे. यावर्षी पावसाने सरासरी गाठली नाही. परिणामी, पावसाळ्यातच अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली. सप्टेंबरच्या पंधरवाड्यात परतीचा पाऊस झाल्याने, मराठवाडा आणि विदर्भातील पावसाची सरासरी बऱ्यापैकी भरून निघाली. या पावसाने टँकरची संख्या कमी केली. आॅगस्टपर्यंत १७५१ ठिकाणी पाणीटंचाईची तीव्रता निर्माण झाली होती. आता ही संख्या ४८६ वर आली. राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या १२ आॅक्टोबर २०१५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, राज्यात ४८६ गावांत ६५४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये १३६ शासकीय व ५१८ खासगी टँकरचा समावेश आहे. गतवर्षी हाच आकडा ४९ होता. या वर्षी अल्प पाऊस झाल्याने अनेक गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
पाणीटंचाईची धग सर्वाधिक मराठवाड्यात आहे. येथे ३१९ गावांत ४४९ टँकर सुरू आहेत. नागपूर व कोकण, अमरावती विभागात पाणीटंचाई नसल्याची नोंद पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या दप्तरी आहे. नाशिक विभागातील १०४ गावांमध्ये १३० टँकर, पुणे विभागातील ६३ गावांमध्ये ७५ टँकर व औरंगाबाद विभागात ३१९ गावांत ४४९ टँकर असे एकूण ४८६ गावांमध्ये ६५४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

Web Title: Water supply to 486 villages of 654 tankers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.