भुसावळहून रेल्वेद्वारे लातूरला पाणी पुरवठ्याचे नियोजन

By admin | Published: March 30, 2016 12:58 AM2016-03-30T00:58:19+5:302016-03-30T00:58:19+5:30

दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यातील लातुरला भुसावळ रेल्वे विभागातर्फे रेल्वे वॅगनने पिण्याचे पाणी पोहचविण्याचे नियोजन स्थानिक रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Water supply arrangement to Latur from Bhusawal | भुसावळहून रेल्वेद्वारे लातूरला पाणी पुरवठ्याचे नियोजन

भुसावळहून रेल्वेद्वारे लातूरला पाणी पुरवठ्याचे नियोजन

Next

भुसावळ : दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यातील लातुरला भुसावळ रेल्वे विभागातर्फे रेल्वे वॅगनने पिण्याचे पाणी पोहचविण्याचे नियोजन स्थानिक रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. डीआरएम सुधीरकुमार गुप्ता यांनी त्याबाबत विशेष सूचना दिल्या आहेत, अशी माहिती रेल्वेच्या जनसंपर्क विभागाचे राजू पाटील यांनी दिली.
पाण्याच्या वॅगन कधी रवाना होणार याची तारीख मात्र अद्याप निश्चित झालेली नाही. लातूर येथील भीषण पाणी टंचाई लक्षात घेता रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वेने पाणी पुरवठा करण्याचे आधीच सूचित केले होते. भुसावळ येथे पाणी उपलब्ध असल्याने ती जबाबदारी रेल्वेवर सोपविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मध्यंतरी अकोला येथे लातूर प्रमाणेच भीषण पाणी
टंचाईची स्थिती होती. त्यावेळीही भुसावळ येथून रेल्वेने अकोला येथे पाणी पुरवठा करण्यात आला
होता. (प्रतिनिधी)

एका वॅगनमध्ये
६५ हजार लीटर पाणी
बीटीपीएस प्रकारातील टँकरद्वारे ५५-५६ टन माल वाहून नेला जातो, तर ६४ ते ६५ हजार लीटर पाणी वाहून नेले जाते. त्यानुसार आठ टँकरमधून लातूरसाठी पाणी पाठविण्याचे नियोजन भुसावळ रेल्वे विभाकडून केले जात आहे.

Web Title: Water supply arrangement to Latur from Bhusawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.