पाणी पुरवठा विभागाचा संप मागे
By admin | Published: December 9, 2015 01:25 AM2015-12-09T01:25:46+5:302015-12-09T01:25:46+5:30
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर संप मागे घेतला आहे. त्यामुळे राज्यातील सुमारे ८२ नळ योजनांचा दोन दिवसांपासून बंद असलेला
अमरावती : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर संप मागे घेतला आहे. त्यामुळे राज्यातील सुमारे ८२ नळ योजनांचा दोन दिवसांपासून बंद असलेला पाणी पुरवठा बुधवारपासून नियमित सुरू होईल.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, नागपूर या प्रादेशिक विभागांतर्गत जवळपास २५ नळ योजना चालविल्या जात आहे. शिवाय ५७ प्रादेशिक योजनांच्या देखभाल दुरुस्तीचीही जबाबदारी या विभागाकडे आहे. या विभागांतर्गत चालविल्या जाणाऱ्या योजनांच्या माध्यमातून हजारो गावांना पाणी पुरवठा केला जातो. त्यात सर्वाधिक ६३० गावे अमरावती विभागातील आहेत. आंदोलनामुळे ८२ नळ योजना प्रभावित झाल्या आहेत. (प्रतिनिधी)