मराठवाड्यात पाच गावांना केला पाणी पुरवठा

By Admin | Published: May 2, 2016 12:39 AM2016-05-02T00:39:17+5:302016-05-02T00:39:17+5:30

उन्हाचा तडाखा आणि त्यात पाणी नाही. त्यामुळे मराठवाड्यातील लोकांचे हाल होत आहेत. पाणी आणण्यासाठी त्यांना मैलोन मैल चालत जावे लागते. इतके कष्ट घेऊनही त्यांना पुरेसे पाणी

Water supply to five villages in Marathwada | मराठवाड्यात पाच गावांना केला पाणी पुरवठा

मराठवाड्यात पाच गावांना केला पाणी पुरवठा

googlenewsNext

मुंबई: उन्हाचा तडाखा आणि त्यात पाणी नाही. त्यामुळे मराठवाड्यातील लोकांचे हाल होत आहेत. पाणी आणण्यासाठी त्यांना मैलोन मैल चालत जावे लागते. इतके कष्ट घेऊनही त्यांना पुरेसे पाणी मिळेल याची शाश्वती नसते. मराठवाड्यातील पाच गावांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबवण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मुंबई युनिटने पुढाकार घेतला आहे. पुढचे ४० दिवस म्हणजे मान्सून दाखल होईपर्यंत या गावांना पाणी पुरवठा केला जाणार आहे. वैजापूर येथील कारंजा गाव आणि हडपपिंपळ गाव या दोन गावांना रविवारी आयएमए पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. आणि या दोन गावांना पाणी पुरवठा सुरु केला आहे. तर, वैजापूर येथील अजून एका गावाला आणि जालना जिल्ह्यातील दोन गावांमध्ये हा उपक्रम सोमवारपासून सुरु करण्यात येणार असल्याची माहिती ‘आयएमए’चे पदाधिकारी डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी दिली. या उपक्रमात ‘मराठवाडा ग्रामीण विकास संस्था’ आयएमएला मदत करणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Water supply to five villages in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.