जालनामधून लातूरला रेल्वेने होणार पाणीपुरवठा
By admin | Published: May 1, 2016 12:47 AM2016-05-01T00:47:50+5:302016-05-01T00:47:50+5:30
परतूर (जि. जालना) येथील निम्न दुधना प्रकल्पावरुन दुष्काळग्रस्त लातूर शहर आणि जिल्ह्याला रेल्वेने पाणीपुरवठा करण्यासंदर्भात पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी रेल्वेमंत्री
मुंबई : परतूर (जि. जालना) येथील निम्न दुधना प्रकल्पावरुन दुष्काळग्रस्त लातूर शहर आणि जिल्ह्याला रेल्वेने पाणीपुरवठा करण्यासंदर्भात पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी चर्चा केली. निम्न दुधना प्रकल्पातील उपलब्ध साठ्यातून लातूरला अधिकचा पाणीपुरवठा करण्याबरोबरच जिल्ह्यातील उदगीरसह अन्य टंचाईग्रस्त शहरे आणि गावांनाही पाणीपुरवठा करता येईल, असे त्यांनी प्रभू यांना सांगितले. राज्य सरकारने यासंदर्भात प्रस्ताव पाठवावा, त्याचा निश्चितच सकारात्मक विचार करू, असे रेल्वेमंत्री प्रभू यांनी त्यांना सांगितले. परतूर तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पातून सध्या परतूर नगर परिषदेला पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी निम्न दुधना प्रकल्पावरुन परतूर नगरपरिषदेची पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. परतूर येथे अधिक क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. (प्रतिनिधी)