तानसा जलवाहिनीच्या तातडीच्या दुरुस्तीमुळे आज आणि उद्या मुंबई शहराचा पाणीपुरवठा बंद

By admin | Published: June 15, 2016 03:08 PM2016-06-15T15:08:00+5:302016-06-15T15:08:00+5:30

तानसा जलनाहीनीची तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतल्यामुळे मुंबईमध्ये पाणी कपात केली जणार आहे.⁠⁠ कोणत्या ठिकाणी केव्हां पाणी येईल त्याची सविस्तर माहीती खालील प्रमाणे आहे.

Water supply to Mumbai city is closed today and tomorrow due to the emergency repair of the Tansa water channel | तानसा जलवाहिनीच्या तातडीच्या दुरुस्तीमुळे आज आणि उद्या मुंबई शहराचा पाणीपुरवठा बंद

तानसा जलवाहिनीच्या तातडीच्या दुरुस्तीमुळे आज आणि उद्या मुंबई शहराचा पाणीपुरवठा बंद

Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १५ : तानसा जलनाहीनीची तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतल्यामुळे मुंबईमध्ये पाणी कपात केली जणार आहे.⁠⁠ कोणत्या ठिकाणी केव्हां पाणी येईल त्याची सविस्तर माहीती खालील प्रमाणे आहे. जलवाहीनीचे काम सुरु असल्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. त्याचप्रमाणे रस्त्यावर वाहणाच्या रांगाचा रागां लागलेल्या आहेत.
 
गावडे चौक, सेनापती बापट मार्ग येथील अस्तित्वात असलेल्या १४५० मी.मी व्यासाच्या तानसा पुर्व व पश्चिम मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्त करण्याचे काम दि. १५.०६.२०१६ रोजी सकाळी ०८.०० वाजेपासून सुरु होऊन ते दि. १६.०६.२०१६ रोजी सकाळी ०८:०० वाजेपर्यंत पुर्ण करण्यातयेणार असल्याने या कालावधीत डी विभाग, ई विभाग, जी/उत्तर व जी/दक्षिण विभागातील पाणी पुरवठयावर खालील प्रमाणे परिणाम होणार आहे.
 
डी विभाग
बुधवार दि.१५.०६.२०१६ रोजी सकाळी ०८:०० ते  गुरुवार दि. १६.०६.२०१६ रोजी संकाळी ०८:०० नायर हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल स्टेशन या भागात पाणी पुरवठा होणार नाही
 
ई विभाग
बुधवार दि.१५.०६.२०१६ रोजी सकाळी ०८:०० ते  गुरुवार दि. १६.०६.२०१६ रोजी संकाळी ०८:००
कस्तुरबा हॉस्पिटल या भागात पाणी पुरवठा होणार नाही
जी/दक्षिण
बुधवार दि १५.०६.२०१६ रोजी  दुपारी ०२:०० ते दुपारी ०३:०० - डिलाई रोड ना. म. जोशी बी.डी.डी चाळ या भागात पाणी पुरवठा होणार नाही
 
जी/दक्षिण
बुधवार दि. १५.०६.२०१६ रोजी दुपारी ०४:०० ते संध्याकाळी ०७:०० -  सिटी सप्लाय प्रभादेवी जनता कॉलनी आदर्श नगर्,एलफिस्टन लोअर परेल या भागात पाणी पुरवठा होणार नाही

जी/दक्षिण
गुरुवार दि. १६.०६.२०१६. रोजी सकाळी ०४:०० ते सकाळी ०७:०० - क्लार्क रोड धोबी घाट सातरस्ता या भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.
 
जी/दक्षिण
गुरुवार दि. १६.०६.२०१६ रोजी सकाळी ०४:३० ते सकाळी ०७:४५ -डिलाई रोड ना.म. जोशी बी.डी.डी चाळ. ना.म. जोशी मार्ग सखाराम बाळा पवार मार्ग महादेव पालव मार्ग या भागात पाणी पुरवठा होणार नाही.
 
जी/उत्त्तर
बुधवार दि. १५.०६.२०१६ रोजी दुपारी ०४:०० ते संध्याकाळी ०७:००  तसेच संध्याकाळी ०७:०० ते रात्री १०:००
एलफिस्टन,काकासाहेब गाडगीळ मार्ग,सेनापती बापट मार्ग,गोखले रोड, वीरसावरकर रोड,एल.जे. रोड,सयानी रोड, भवानी शंकर रोड,सेनाभवन परिसर, मोरी रोड, टि.एच. कटारीया मार्ग,कापड बाजार, पुर्ण माहिम (प) विभाग, माटुंगा (प) विभाग,दादर (प) या विभागात पुर्णत: पाणी पुरवठा होणार नाही.

 

Web Title: Water supply to Mumbai city is closed today and tomorrow due to the emergency repair of the Tansa water channel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.