वसई विरार शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनीला वरई फाट्यावर गळती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 11:08 PM2021-09-02T23:08:53+5:302021-09-02T23:09:17+5:30
शुक्रवारी पाणीपुरवठा विभाग घेणार दुरुस्तीचे काम हाती; नवीन योजनेतून सुरू राहणार पाणीपुरवठा
आशिष राणे, लोकमत न्यूज नेटवर्क
वसई:वसई विरार शहर महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाच्या जुन्या योजनेच्या जलवाहिनीला मुंबई- अहमदाबाद महामार्गालगत वरई फाटा येथे गुरुवारी रात्री उशिरा गळती सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर लागलीच या नादुरुस्त जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम शुक्रवार दि.03 सप्टेंबर रोजी सकाळी 09:30 वाजता सुरू करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या जलवाहिनी दुरुस्तीसाठी अंदाजे चार ते पाच अथवा अर्ध्या दिवसांहुन ही अधिक कालावधी लागणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे नियंत्रक यांनी लोकमत ला सांगितले. दरम्यान शुक्रवारी दुपारी 2 ते 2:30 वाजेपर्यंत हे दुरुस्तीचे हे पुर्ण होणार असून या कालावधीत सूर्या धरणाच्या जुन्या योजनेतून होणारा पाणीपुरवठा पुर्ण पणे बंद राहणार आहे.
याखेरीज सुर्याच्या धरणांच्या नवीन योजनेतून होणारा पाणी पुरवठा सुरळीत चालू राहणार आहे, हा जरी नागरिकांना दिलासा असला तरी सूर्याच्या जुन्या योजनेचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने उद्या दि. 03 सप्टेंबर रोजी वसई विरार शहरात होणारा पाणीपुरवठा अनियमित व कमी प्रमाणात तसेच कमी दाबाने सुरू राहील त्यामुळे नागरिकांनी पाणी जपुन वापरावे व वसई विरार शहर महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केलं आहे