नंदुरबारमध्ये दोन पाड्यांवर यंदा टँकरने पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2017 05:26 AM2017-02-09T05:26:32+5:302017-02-09T05:26:32+5:30

गेल्या दहा वर्षांपासून पाणीटंचाई जाणवणाऱ्या धडगाव तालुक्यातील गौऱ्याचा बोदलापाडा आणि गुगलमालपाडा येथे यंदाही टँकर किंवा बैलगाडीने पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार आहे.

Water tanker in two ponds in Nandurbar this year | नंदुरबारमध्ये दोन पाड्यांवर यंदा टँकरने पाणी

नंदुरबारमध्ये दोन पाड्यांवर यंदा टँकरने पाणी

Next

नंदुरबार : गेल्या दहा वर्षांपासून पाणीटंचाई जाणवणाऱ्या धडगाव तालुक्यातील गौऱ्याचा बोदलापाडा आणि गुगलमालपाडा येथे यंदाही टँकर किंवा बैलगाडीने पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार आहे.
जिल्ह्यात धडगाव तालुक्यातील दोन पाडे वगळता अन्य कोणत्याही गाव किंवा पाड्याला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ गेल्या १५ वर्षांत आलेली नाही. यंदा दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात पाणीटंचाई जाणवणाऱ्या सर्वाधिक गावांची संख्या नंदुरबार व तळोदा तालुक्यात आहे, तर सर्वाधिक पाड्यांची संख्या धडगाव तालुक्यातील आहे. यात नंदुरबार तालुक्यातील ५० गावे व एक पाडा, नवापूर तालुक्यातील २३ गावे व एक पाडा, शहादा तालुक्यातील ३३ गावे व सहा पाडे, तळोदा तालुक्यातील ४४ गावे, अक्कलकुवा तालुक्यातील ३० गावे व १७५ पाडे आणि धडगाव तालुक्यातील २१७ पाड्यांचा समावेश असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Water tanker in two ponds in Nandurbar this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.