सासवडला जुलैअखेरपर्यंत पाणी

By admin | Published: May 21, 2016 01:12 AM2016-05-21T01:12:55+5:302016-05-21T01:12:55+5:30

जुलै महिनाअखेर पुरेल इतका उपयुक्त पाणीसाठा वीर जलाशयात शिल्लक असल्याने सासवडकरांना पाणीटंचाई भासणार नाही

Water till Saswada till July | सासवडला जुलैअखेरपर्यंत पाणी

सासवडला जुलैअखेरपर्यंत पाणी

Next


सासवड : जुलै महिनाअखेर पुरेल इतका उपयुक्त पाणीसाठा वीर जलाशयात शिल्लक असल्याने सासवडकरांना पाणीटंचाई भासणार नाही, अशी माहिती नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप व पाणीपुरवठा सभापती सुहास लांडगे यांनी दिली.
वीर धरण पाणीपुरवठा योजनेची व वीर धरणातील पाणीसाठ्याची समक्ष पाहणी नगराध्यक्षांनी केली. या वेळी उपनगराध्यक्ष व पाणीपुरवठा समितीचे सभापती सुहास लांडगे, नगरसेवक अजित जगताप, मनोहर जगताप, पाणी विभागाचे ज्ञानेश्वर गिरमे उपस्थित होते. वीर धरणात सध्या अंदाजे दीड टीएमसी पाणी शिल्लक आहे. सासवडच्या पाणीपुरवठा योजनेच्या चारीमध्ये १० फुट पाणी आहे; त्यामुळे पाणी कमी पडणार नाही. जर धरणाच्या कालव्यातून पाणी सोडले व योजनेच्या चारीखाली पाणी गेले, तर पाणी जॅकवेलमध्ये आणण्यासाठी पालिकेने यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
सध्या केवळ वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास व या भागात वादळ झाल्याने वीजपुरवठा खंडित न झाल्यास पाणी पुरवठ्यात अडथला जाणवणार नाही. वीजपुरवठा खंडित झाला तर मात्र थोडी अडचण होऊ शकते. त्यामुळे आवश्यक असणारे पाणी पंपिंग करून दोन दिवसाआड पाणी पुरविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा व्यवस्थित पार पडेल, असे नियोजन केले असल्याची माहिती नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप व पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष सुहास बापू लांडगे यांनी दिली.
सासवड शहरास रोज ५५ ते ६० लाख लिटर पाण्याची गरज लक्षात घेऊन वीजपुरवठ्यावर अवलंबून असलेली योजना सलग दोन दिवस पाणी उचलून साठवण टाक्यात ठेवले जाते. सकाळी-रात्री अशा दोन वेळेत बंद नळाद्वारे पाणी देण्यात येते. सासवड शहराला गराडे, घोरवडी व वीर धरणांतून पाणीपुरवठा होत होता. परंतु, तालुक्यातील टंचाईची परीस्थित लक्षात घेत व या जलाशयावर असणाऱ्या इतर गावांच्या पाणी योजनेसाठी पाणीपुरवठा व्हावा म्हणून गराडे व घोरवडीतील पाणी सासवडला देणे बंद आहे. (वार्ताहर)

Web Title: Water till Saswada till July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.