नाशकात जलवाहिनीतून पाणीचोरी!

By admin | Published: April 16, 2016 02:28 AM2016-04-16T02:28:36+5:302016-04-16T02:28:36+5:30

सिन्नर तालुक्यातील कणकोरीसह पाच गाव पाणीपुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्रात कमी दाबाने पाणी येत असल्याने पोलिसांनी शोधमोहीम राबविली. त्यात मुख्य

Water from the water from the water drain! | नाशकात जलवाहिनीतून पाणीचोरी!

नाशकात जलवाहिनीतून पाणीचोरी!

Next

नाशिक : सिन्नर तालुक्यातील कणकोरीसह पाच गाव पाणीपुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्रात कमी दाबाने पाणी येत असल्याने पोलिसांनी शोधमोहीम राबविली. त्यात मुख्य जलवाहिनीतून तब्बल पाच ठिकाणी पाणीचोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दुसरीकडे पालखेड डाव्या कालव्यातून पाणीचोरी करणाऱ्या शेतकऱ्यांमागे पोलिसांचा ससेमिरा लागला आहे.
सिन्नरमध्ये एअर व्हॉल्व्हमधून अडीच ते तीन इंच पाइप टाकून राजरोस पाणीचोरी केली जात असल्याचा प्रकार पाहून समितीचे सदस्य व पोलीसही अवाक् झाले. सुमारे १५ हजार ग्रामस्थ या योजनेवर अवलंबून आहे. जलशुद्धीकरण केंद्रात पाणी येत नसल्याने चोरीचा संशय बळावला होता. पथकाने गुरुवारी रात्री जलशुद्धीकरण केंद्र ते धरणापर्यंत पाहणी केल्यानंतर रामवाडी शिवारातील जलवाहिनीवरील एअर व्हॉल्व्हमधून पाइप टाकण्यात आल्याचा प्रकार आढळला. धरणापर्यंत असे चार प्रकार आढळून आले. (प्रतिनिधी)

शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल
पालखेड डाव्या कालव्यातून पाणीचोरी करणाऱ्या शेतकऱ्यांमागे पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. पाणी सोडल्यानंतर रातोरात शेतकऱ्यांकडून कालव्यात डोंगळे टाकून पाणीचोरी झाली. लासलगाव, निफाड, येवला तालुका पोलिसांत दहा गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी कारवाई सुरू केल्याने शेतकरी सैरभैर झाले आहेत.

Web Title: Water from the water from the water drain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.