लातुरात झाली आघाडी

By admin | Published: January 30, 2017 12:33 AM2017-01-30T00:33:05+5:302017-01-30T00:33:05+5:30

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाली असून, औसा विधानसभा मतदार संघातील गट व गणातील जागांची बोलणी अद्याप सुरू आहे़

The wave took place | लातुरात झाली आघाडी

लातुरात झाली आघाडी

Next

लातूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाली असून, औसा विधानसभा मतदार संघातील गट व गणातील जागांची बोलणी अद्याप सुरू आहे़ उर्वरित ४ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या वाट्याला जि़प़च्या १० तर पंचायत समितीसाठी ११ जागा आल्या आहेत़
या संदर्भात आघाडीची गेल्या पंधरा दिवसांपासून बोलणी सुरू होती़ दोन्हीही पक्षांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही घेतल्या असताना आघाडीचे संकेत दिले जात होते़ रविवारी संयुक्त पत्रकार परिषदेत आमदार दिलीपराव देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आ़ बाबासाहेब पाटील यांनी आघाडी झाल्याचे जाहीर केले़
लातूर ग्रामीण, अहमदपूर, उदगीर आणि निलंगा विधानसभा मतदार संघातील गट व गणाच्या जागांची बोलणी पूर्ण झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील मुरूड, अहमदपूर विधानसभा मतदार संघातील शिरूरताजबंद, रोकडा सावरगाव, खंडाळी, नळेगाव, जानवळ, चापोली, उदगीर विधानसभा मतदार संघातील तोगरी, लोहारा आणि निलंगा विधानसभा मतदार संघातील हलगरा जि़प़ गट सोडण्यात आला आहे़ याच गटातील प्रत्येकी १ पं़स़ गणाची जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आली आहे़ लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील २ पंचायत समितीच्या जागा राष्ट्रवादीला देण्यात आल्या आहेत़ जि़प़च्या १० आणि पंचायत समितीच्या ११ जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आल्या असून उर्वरित ३९ गट आणि ८७ गण काँग्रेसकडे असल्याची माहिती दिलीपराव देशमुख, बाबासाहेब पाटील यांनी या पत्रपरिषदेत दिली़

९ गट, १८ गणांसाठी बोलणी सुरू
लातूर जिल्हा परिषदेत एकूण ५८ जागा आहेत़ त्यापैकी औसा विधानसभा मतदार संघातील जागांची बोलणी सुरूच आहे़ औसा विधानसभा मतदार संघात जि़प़चे ९ गट आणि पं़स़चे १८ गण आहेत़़ पुढील दोन दिवसांत या संदर्भात निर्णय होणार असल्याचे दिलीपराव देशमुख यांनी सांगितले़

Web Title: The wave took place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.