सांगवी परिसरातील ऊस जळण्याच्या मार्गावर
By admin | Published: November 5, 2016 01:15 AM2016-11-05T01:15:53+5:302016-11-05T01:15:53+5:30
सांगवी (ता. बारामती) परिसरातील उसाची पिके जळण्याच्या मार्गावर आहेत.
सांगवी : सांगवी (ता. बारामती) परिसरातील उसाची पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. सांगवी परिसरातील बहुतेक शेती ही नीरा डाव्या कालव्यावर अवलंबून आहे. सांगवी परिसरातील उसाची पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे शेतकरीवर्गात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही पिके वाचविण्यासाठी शेतीला पाणी मिळण्यासाठी नीरा डाव्या कालव्याचे आवर्तन सोडण्यासाठी शेतकरीवर्गातून मागणी होत आहे. गेल्या वर्षी असणाऱ्या दुष्काळाने शेतकरीवर्गाला गव्हाची पिके पेरता आली नव्हती. त्यामुळे सध्याच्या थंडीत कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असणारे शेतकरी गव्हाच्या पेरणीसाठी तयारी दर्शवत आहेत. यासाठी जलसंपदा खात्याने सांगवी परिसरातील उसाची पिके व गव्हाची पेरणी करण्यासाठी आवर्तन सोडण्याची मागणी शेतकरीवगार्तून होत आहे.(वार्ताहर)
>सांगवी परिसरातील शेती ही नीरा डाव्या कालव्याच्या वितरिका क्रमांक १८वर अवलंबून आहे. सांगवी, कांबळेश्वर, शिरवली, धुमाळवाडी, पवईमाळ व भिकोबानगर या परिसरातील गावांतील उसाची पिके जळण्यास सुरुवात झाली आहे. पाण्याअभावी उभी पिके जळत आहेत. सध्याच्या थंडीमुळे गव्हाच्या पेरण्याही रखडल्या आहेत.