विक्रमगडातील इमूपालन बंद होण्याच्या मार्गावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2017 03:46 AM2017-01-17T03:46:42+5:302017-01-17T03:46:42+5:30

शेती पूरक व्यवसाय म्हणून गेल्या काही वर्षापासून शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन सुरू केलेला इमू पालन व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे.

On the way to the closure of the Vikramagad imager! | विक्रमगडातील इमूपालन बंद होण्याच्या मार्गावर!

विक्रमगडातील इमूपालन बंद होण्याच्या मार्गावर!

Next

राहुल वाडेकर,

विक्रमगड- शेती पूरक व्यवसाय म्हणून गेल्या काही वर्षापासून शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन सुरू केलेला इमू पालन व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे. पालनाचा वाढता खर्च व इमूची इंडी आणि मांस याला भाव आणि बाजारपेठ नसल्यामुळे हा व्यवसाय करणारे शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबून गेले आहेत.
इमू पालन करणा-या शेतकऱ्यांना इमू पक्षांना रोजचे खाद्य पुरविणे शक्य होत नसल्याने इमू मृत्यूमुखी पडत आहेत़ गोदामामध्ये पुरेसे उपलब्ध खाद्य नाही, खाद्य आणण्यासाठी शेतक-यांजवळ पुरसा पैसा नाही़ अंडी विकत घेण्यावरही मर्यादा पडल्या आहेत़ तसेच विकत घेतलेल्या अंडयाचे पैसे मिळत नाहीत,त्यामुळे अंडीही गोदामध्ये पडुन राहात आहेत़ या व्यवसायाकरीता घेतलेल्या कर्जाचा डोंगर त्यावर आकारले जाणारे व्याज व हया व्यवसायात निर्माण झालेल्या अडचणी अशा दुहेरी संकटात इमू पालन करणारा शेतकरीवर्ग सापडल्यामुळे हा व्यवसाय बंद झाला आहे़
विक्रमगड तालुक्यातील मौजे उटावली-चौधरीपाडा येथील शेतकरी निकुळे यांनी त्यावेळेस आपल्या मालकीच्या जागेमध्ये गेल्या ७ वर्षापूर्वी इमूपालन सुरु केले होते,परंतु हया व्यवसायाला बाजारात शुन्य किंमत असल्याने त्यांनी या व्यवसायासाठी घेतलेले कर्ज फेडणेही मुश्किल झाले आहे. त्यांचेजवळ ५७ पक्षी होते,त्यातील काही पक्षी खादयाविना मृत्यू पावले आहेत़ तर काही ओळखीच्या माणसांना त्यांनी विनामोबदला दिले़ त्यानंतर त्यांच्याजवळ १६पक्षी शिल्लक होते ते जगविण्यासाठी त्यांना रोजचा २०० रुपये हुन अधिक खर्च करावा लागत होता़ पक्षांना खादय दिले नाही तर ते मरतात़ या व्यवसायाकरीता घेतलेल कर्ज त्यांच्यावर आहे़ आतापर्यत १० लाख खर्च करुन मुद्दलही सुटले नाही. त्यामुळे व्यवसाय बंद केला तरी त्यांना त्यासाठी घेतलेले कर्ज फेडावे लागते आहे असेच अनेक विक्रमगड तालुक्यातील अनेक शेतक-यांनी हा व्यवसाय सुरु केला होता. ते सगळेच अडचणीत आहेत़ शेतीपूरक व्यवसाय म्हणून इमू पालन व्यवसायासाठी सहकारी बँकेकडून शेतक-यांना कर्जे देण्यांत आली होती त्यामुळे अनेकांनी उत्साहाने हा व्यवसाय सुरू केला. परंतु अंडी विकत घेतली जात नाहीत विकली गेली तर त्याचे पैसे मिळत नाहीत़ त्याच्या मांसालाही मागणी नाही. त्यात खाद्य महागलेले अशा स्थितीत हा व्यवसाय बंद करण्यावाचून शेतक-यांपुढे अन्य पर्यायच उरलेला नव्हता.इमू हा मूळचा आॅस्ट्ेलियन पक्षी आहे़ भारतामध्ये प्रथम १९९६ पासुन आंध्र प्रदेशात इमू पालनास सुरुवात झाली़ इमू पक्ष्यांच्या शरीराच्या सर्व अवयवांपासुन उत्पन्न मिळते. एका वर्षात एका इमूपासुन २५ ते ४० अंडी मिळतात़ इमूचे मांस ९८ टक्के कॉलेस्ट्रॉल फ्री असते़ पूर्ण वाढ झालेल्या एका इमू पासुन ३ ते ५ लिटर कच्चे तेल मिळते़ इमूच्या एका अंडयाला प्रत्येकी १५०० ते १७०० रुपये भाव मिळत होता,तर त्याच्यापासून मिळणा-या तेलाला प्रती लिटर ३००० ते ४००० रुपये बाजारभाव मिळतो याचा अर्थ या व्यवसायातून मिळणाऱ्या नफ्याचे जे गोंडस चित्र शेतकऱ्यांपुढे मांडले गेले ते बनावट असावे व केवळ इमू विक्रेत्यांचा लाभ घडविण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जबाजारी करून हा व्यवसाय करण्यास भरीस पाडले गेल्याची चर्चा आहे.
>व्यावसायिकांची फसवणूक केली की बाजार घसरला?
प्रारंभी इमूची तीन महिन्यांची जोडी प्रत्येकी १८ हजार रुपयांना होती मात्र,त्यानंतर जोडीचा बाजारभाव प्रयेकी २००० रुपये एवढा झालेला होता़. इमूच्या अंडयास प्रारंभी ५०० रुपये एवढाच बाजारभाव मिळत होता. आता तो शून्य आहे. एका इमूला दिवसाला १६.५० भावाचे १ किलो खाद्य लागते़
इमू पासून फायदा मिळु शकतो असे त्यावेळेस शेतक-यांना सांगण्योंत आले होते त्यानुसार हा व्यवसाय शेतकऱ्यांनी सुरुवात केली मात्र अशा कोणत्याही प्रकारचा फायदा शेतकऱ्यांना न झाल्याने हा व्यवसाय संकटात सापडलेला आहे़ त्यापासुन नफा होण्याएैवजी शेतकरी तोटयात चाललेले आहे़ या व्यवसायसाकरीता घेतलेले कर्ज अजुनही डोक्यावर आहे़ त्यामुळे आता हा व्यवसाय जवळ जवळ बंद झालेला आहे़

Web Title: On the way to the closure of the Vikramagad imager!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.