हर्षदाचा ‘बाबासाहेब’ प्रदर्शनाच्या वाटेवर

By admin | Published: August 4, 2016 02:41 AM2016-08-04T02:41:05+5:302016-08-04T02:41:05+5:30

भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून त्यांच्या संघर्षमय कहाणीचा सार बाबासाहेब या चित्रपटात दिसून येणार आहे.

On the way to Harshad's 'Babasaheb' exhibition | हर्षदाचा ‘बाबासाहेब’ प्रदर्शनाच्या वाटेवर

हर्षदाचा ‘बाबासाहेब’ प्रदर्शनाच्या वाटेवर

Next


वसई : भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून त्यांच्या संघर्षमय कहाणीचा सार बाबासाहेब या चित्रपटात दिसून येणार आहे. वसईतील हर्षदा बामणे ही या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटाचे सर्व चित्रीकरण पूर्ण झाले असून, नंदेश उमप यांच्या पहाडी आवाजात बाबासाहेबांच्या जीवनावरील एक जबरदस्त पोवाडा नुकताच संगीतबद्ध करण्यात आला.
रायझिंग लोटस फिल्म हाऊस निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन भूषण तांबे आणि क्रिएटिव्ह दिग्दर्शन योगेश जाधव यांनी केले आहे.चित्रीकरणाची बाजू हर्षल सुपोस्कर यांनी सांभाळली आहे.निर्माते सत्यवान गावडे आणि सहनिर्माता बाळकृष्ण पाटील यांच्या या चित्रपटाला डॉ. बामणे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. व्यवस्थापनाची बाजू पूनम घोरपडे हिने सांभाळली आहे.परदेशी अभिनेत्री सॅमी आणि मराठीतील ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे या दोन बड्या स्टार्ससोबत महत्तपूर्ण भूमिका हर्षदा करीत आहे. बाबासाहेब चित्रपट समाजातील सर्वच घटकांना अंजन घालणारा आहे. हा चित्रपट एक माहितीपटही नाही आणि करमणूकप्रधानही नाही. एक आगळीवेगळी कथा असलेल्या या चित्रपटात ग्रामीण भागाच्या विलोभनीय दृश्याबरोबरच मागासलेल्या विचारसरणीचेही दाहक चित्रण पाहता येईल आणि त्यामुळेच तो सर्वांना नक्कीच आवडेल, अशी आशा हर्षदाने व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)
>महाविद्यालयातून लहानसहान एकांकिका करताना या चित्रपटातील भूमिकेसाठी हर्षदाला आॅर्डर आली. बी.एस.सी.चे शिक्षण घेत असताना तिने या चित्रपटातील आपली भूमिका प्रामाणिकपणे पार पाडली आहे. पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आणि दिग्गज अभिनेते शरद पोंक्षे यांच्याबरोबर अभिनय करताना ती डगमगली नाही. त्यामुळे तिचे बाबासाहेब टीमकडून कौतुक करण्यात आले आहे.

Web Title: On the way to Harshad's 'Babasaheb' exhibition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.