डावपेचांवर आव्हाडांनी फेरले पाणी!
By admin | Published: July 15, 2015 12:29 AM2015-07-15T00:29:24+5:302015-07-15T00:29:24+5:30
विरोधी पक्षाने या आठवड्यात फक्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उचलायचा, असा निर्णय दोघांच्या बैठकीत झाला होता. त्यानुसार अधिवेशनाच्या दोन्ही दिवशी विरोधकांनी
मुंबई : विरोधी पक्षाने या आठवड्यात फक्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उचलायचा, असा निर्णय दोघांच्या बैठकीत झाला होता. त्यानुसार अधिवेशनाच्या दोन्ही दिवशी विरोधकांनी कर्जमाफीसाठी सभागृहाचे कामकाज बंद पाडले. मात्र मंगळवारी दुपारी सगळे सदस्य तिसरे सभागृह भरवून लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याजवळ बसले तेव्हा विधीमंडळाच्या पायऱ्यांवर मात्र आ. जितेंद्र आव्हाड अचानक पिशवीतून सूर्यकांता चिक्कीची पाकिटे घेऊन आले. त्यांच्या चिक्की विकण्याच्या नाट्यामुळे कर्जमाफीचा मुद्दा मागे पडला. त्यातच ही चिक्की खाऊन मेल्याचे नाटक आमदारांनी टिळकांच्या पुतळ्याजवळच केले. त्यावर काहीवेळ दबक्या आवाजात विरोधकांमध्ये चर्चा झाली आणि नंतर टिळकांना साक्षी ठेवून
अभिरुप विधानसभा भरवण्याचा निर्णय झाला. त्यात पुन्हा विरोधकांनी कर्जमाफीचा मुद्दा रेटून नेला...
उद्धव हमारे साथ है, ये अंदर की बात है..!
ये अंदर की बात है... उद्धव हमारे साथ है... अशा घोषणा राष्ट्रवादीचे
आ. जितेंद्र आव्हाड यांनी आज देऊन गोंधळ उडवला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलेला असताना शिवसेनेचे नेते आणि आमदार या विषयावर गप्प होते.
सभागृहाबाहेर आव्हाड यांनी उद्धव हमारे साथ है, म्हणत रान उठवले. तर खडसे यांनी उद्धव हे नेते म्हणून बोलत नाहीत तर पत्रकार म्हणून बोलतात तेव्हा त्यांच्यावर पक्षाचा शिक्का कसा मारायचा असा टोला लगावला. या सगळ्यावर शिवसेनेने मात्र मौनच पाळले.