आम्हीच बाबरी तोडणारे, ऑफिसवर कायद्यानुसार कारवाई; संजय राऊतांचा कंगनावर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 04:56 PM2020-09-09T16:56:53+5:302020-09-09T17:53:26+5:30
शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनाच्या कार्यालयावर कायद्यानुसार कारवाई झाली आहे. ही सरकारची कारवाई आहे. माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही, असे म्हटले आहे.
महाराष्ट्र सरकार आणि शिवसेनेसोबतचा अभिनेत्री कंगना राणौतचा वाद आता वेगळ्य़ा वळणावर येऊन पोहोचला आहे. आज कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकाम मुंबई महापालिकेने पाडले. यावर कंगनाने शिवसेना, बीएमसीला बाबराची उपमा दिली. यावर संजय़ राऊत यांनी कंगनाला प्रत्यूत्तर दिले आहे.
कंगनाला विनाकारण बोलायची संधी दिली, प्रसिद्धी दिली; शरद पवारांनी शिवसेनेचे कान टोचले
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनाच्या कार्यालयावर कायद्यानुसार कारवाई झाली आहे. ही सरकारची कारवाई आहे. माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही, असे म्हटले आहे. कंगनाने शिवसेनाला बाबराची सेना म्हटले आहे. यावर राऊत यांनी बाबरी तोडणारे आम्हीच आहोत. ती आम्हाला काय म्हणतेय? कंगनाच्या ऑफिसवरील कारवाईचे टायमिंगबाबतचे उत्तर केवळ मुंबई महापालिकेचे आयुक्त देऊ शकतात. जर कोणी कायदा मोडत असेल तर त्यावर कारवाई केली जाते. अशावेळी पक्षाकडे माहिती असणे गरजेचे नाही, असे सांगितले.
Reliance Jio दणका करणार; स्वस्त किंमतीचे 1 कोटी स्मार्टफोन विकणार
शरद पवार यांनी शिवसेनेचे कान टोचले यावर संजय़ राऊत यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. पवार काय म्हणाले हे आपल्याला माहिती नाहीय. कंगनासोबतचा वाद माझ्यासाठी संपलेला आहे. विधानसभेत तिच्याविरोधात प्रस्ताव आला आहे. गृह मंत्र्यांनीही मत मांडले आहे. अशात कायदा त्याचे काम करत असताना माझे बोलणे उचित नसल्याचे राऊत म्हणाले.
खळबळजनक! पत्नीलाही पाठवायचा ग्राहकांकडे; ऑनलाईन सेक्स रॅकेटचे ट्विटरवरून बिंग फुटले
मुंबई महापालिकेच्या कारवाईचे प्रकरण आता उच्च न्यायालयाच गेले आहे. तिथेच पालिका उत्तर देईल. ही कारवाई बदल्याच्या भावनेतून झालेली नाही. मुंबईत देशभरातील लोक येऊन राहतात. कंगना जे आता काही करत आहे ते सरकारच्या हातात आहे. शिवसेना कधीही आरोपीच्या पिंजऱ्यात उभी राहत नाही. जर कोणी महाराष्ट्राच्या सन्मानाविरोधात खेळत असेल तर लोक नाराज होतात, असेही राऊत म्हणाले.
भारतीयांसाठी उद्या मोठा दिवस; शक्तीशाली योद्धा देशसेवेसाठी झेपावणार