आम्ही अपात्र नाहीच... वाचा ही ६,५०० पानं; शिंदे गटाच्या आमदारांची प्रतिज्ञापत्र सादर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 06:05 AM2023-08-25T06:05:34+5:302023-08-25T06:06:21+5:30

शिंदे गटाच्या ३९ आमदारांकडून प्रत्येकी ६,५०० पानांचे प्रतिज्ञापत्र

We are not disqualified, read these 6500 pages as affidavit Submitted by MLAs of Eknath Shinde group | आम्ही अपात्र नाहीच... वाचा ही ६,५०० पानं; शिंदे गटाच्या आमदारांची प्रतिज्ञापत्र सादर

आम्ही अपात्र नाहीच... वाचा ही ६,५०० पानं; शिंदे गटाच्या आमदारांची प्रतिज्ञापत्र सादर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महाराष्ट्रातील सत्तानाट्यावरील आमदार अपात्रतेची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुरू असून, या सुनावणीतील महत्त्वाचा टप्पा असलेले शिंदे गटाचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. शिंदे गटाच्या ३९ आमदारांकडून प्रत्येकी ६,५०० पानांचे प्रतिज्ञापत्र देण्यात आले आहे. इतक्या लांबलचक प्रतिज्ञापत्रांवर अध्यक्ष काय निर्णय घेतात आणि यासाठी किती कालावधी लागेल, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

मेमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांवर सोपविण्यात आला आहे. योग्य कालावधीत ही निर्णय प्रक्रिया पार पाडण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. ही सुनावणी लवकरात लवकर व्हावी, यासाठी ठाकरे गट पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेला. यावर विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीची प्रक्रिया सुरू केली आहे. ठाकरे गटाच्या १४ आमदारांकडून पावसाळी अधिवेशनाच्या काळातच प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली. शिंदे गटाने मात्र यासाठी वेळ वाढवून मागितली हाेती. 

बाजू मांडली

या प्रतिज्ञापत्रांमध्ये आम्ही कसे अपात्र नाही, हे आम्ही स्पष्ट केले आहे, असे शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी नमूद केले आहे.

व्हीप काेणत्या गटाचा?

न्यायालयाने भरत गाेगावले यांची पक्षप्रतोदपदाची निवड अवैध ठरवली आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर अध्यक्ष काय सुनावणी घेतात आणि कोणत्या गटाचे आमदार अपात्र ठरतात, की आमदारांना कोणत्या गटाचा व्हीप लागू होणार हे आता अध्यक्षांच्या निर्णयावरच ठरणार आहे.

प्रतिज्ञापत्रात काय?

  • आमचीच शिवसेना हा मूळ पक्ष आहे आणि पक्षात फूट नाही.
  • सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची प्रत
  • निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाची प्रत

 

Web Title: We are not disqualified, read these 6500 pages as affidavit Submitted by MLAs of Eknath Shinde group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.