आम्ही नाही, काँग्रेस-राष्ट्रवादीच शिवसेना 'हायजॅक' करत होते; शिंदे समर्थकांनी पुन्हा सोडला 'बाण'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 04:31 PM2022-06-25T16:31:04+5:302022-06-25T16:31:42+5:30
राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट बनवत राज्यात राजकीय भूकंप आणला आहे.
राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट बनवत राज्यात राजकीय भूकंप आणला आहे. त्यामुळे शिवसेना मोठ्या संकटात सापडली असून शिंदे यांच्या बंडाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. दुसरीकडे दिपक केसरकर यांनी मात्र माध्यमांशी संवाद साधताना अनेक प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. आम्ही शिवसेनेतच आहोत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनंच शिवसेना हायजॅक केली होती, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
“आमच्याकडे दोन तृतियांश बहुमत आहे. ५५ आमदारांचा नेता १६ जण कसा बदलणार? विधानसभा उपाध्यक्षांच्या निर्णयाला आम्ही न्यायालयात आव्हान देणार आहोत. आम्ही सगळे शिवसैनिकच आहोत. आम्ही शिवसेना सोडली असं भासवलं जातंय. आम्ही शिवसेनेतच आहोत. लोकांना रस्त्यावर उतरण्याची भाषा चुकीची आहे. बाळासाहेबांचा विचार पुढे नेला जाईल याची खात्री देतो,” असंही केसरकर यावेळी म्हणाले.
आम्हीच शिवसेना आहोत. विधीमंडळात दोन तृतियांश बहुमत सिद्ध करू. शिवसेनेचं अस्तित्व टिकावं म्हणून हा निर्णय हा निर्णय घेतल्याचंही ते म्हणाले. आम्ही कुठेही शिवसेना संपवत नाही. कोणीही उद्धव ठाकरे यांच्याविरोधात नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांवर कोणतेही आरोप करत नाही. आम्हाला सर्वांच्याबाबत प्रेम आहे. पहिल्यापासून आम्ही त्यांना भाजपसोबत राहिलं पाहिजे हे सांगतो. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री जेव्हा एका दिशेने चालताता तेव्हा राज्यही मोठं होतं. पंतप्रधानांना मातोश्री आणि मुख्य करून बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत असल्याचंही ते म्हणाले.