"छापेमारीचं आम्हाला आश्चर्य वाटत नाही...:, बारामती ॲग्रोवरील ईडीच्या कारवाईनंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 05:18 PM2024-01-05T17:18:10+5:302024-01-05T17:31:35+5:30

बारामतीतील जनतेनं माझ्यावर विश्वास टाकल्यामुळे आयुष्यभर मी त्यांची ऋणी राहिल. त्यामुळे, माझं तिकीट कापण्याचा का प्रयत्न करत आहात?" अशी मिश्किल टिप्पणी सुप्रिया सुळेंनी केली आहे.

"We are not surprised by the raid...:, Supriya Sule's reaction on Baramati Agro raid | "छापेमारीचं आम्हाला आश्चर्य वाटत नाही...:, बारामती ॲग्रोवरील ईडीच्या कारवाईनंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

"छापेमारीचं आम्हाला आश्चर्य वाटत नाही...:, बारामती ॲग्रोवरील ईडीच्या कारवाईनंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर शुक्रवारी ( ५ जानेवारी ) सकाळी सक्तवसुली संचालनालयाने ( ईडी ) छापेमारी केली आहे. विशेष म्हणजे, रोहित पवार हे परदेशात असताना बारामती ॲग्रोवर ईडीने छापेमारी केली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

ईडी आणि सीबीआयच्या चौकशी सुरु असलेले ९५ टक्के लोक हे विरोधी पक्षातील आहेत. त्यामुळे छापेमारीचे आम्हाला आश्चर्य वाटत नाही. ही पहिली वेळ नाही. यापूर्वी रजनी इंदुलकर, स्मिता पाटील आणि विजया पाटील या माझ्या तीन बहिणींचा राजकारणाशी लांब लांबपर्यंतचा संबंध नसताना सुद्धा त्यांच्या घरावर ईडीची छापेमारी झाली आहे. आता रोहित पवारांवर ईडीची छापेमारी होत आहे. त्यामुळे हे दुर्दैव असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. त्यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधताना अशी प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, शरद पवार बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत चर्चा रंगल्या आहेत. यावरही सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. "बारामती हा माझा मतदारसंघ नसून कुटुंब आहे. १५ वर्षे झालं मी बारामती मतदारसंघात काम करत आहे. बारामतीतील जनतेनं माझ्यावर विश्वास टाकल्यामुळे आयुष्यभर मी त्यांची ऋणी राहिल. त्यामुळे, तुम्ही माझं तिकीट कापण्याचा का प्रयत्न करत आहात?" अशी मिश्किल टिप्पणी सुप्रिया सुळेंनी केली आहे.

शुक्रवारी (दि.५) सकाळी  पिंपळी (ता. बारामती) येथील बारामती ॲग्रो कंपनीवर सक्तवसुली संचालनालयाने ( ईडी ) छापेमारी केली आहे. या ठिकाणी माध्यम प्रतिनिधी माहिती घेण्यास तळ ठोकून आहेत. मात्र, या छापेमारीबाबत अधिक माहिती मिळालेली नाही. तसेच, ईडीच्या अधिकाऱ्यांचा देखील संपर्क होऊ शकलेला नाही.

छापेमारीनंतर रोहित पवारांचे ट्विट
ईडीच्या छापेमारीनंतर रोहित पवार यांनीही 'एक्स' अकाउंटवर सूचक असे ट्विट केले आहे. "हा आहे स्वाभिमानी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा चेहरा… ज्यांनी पिढ्यान् पिढ्या महाराष्ट्र धर्म जपला आणि वाढवला… अन्यायाविरोधात प्रसंगी संघर्ष करण्याची शिकवणही या महान विभूतींनी दिल्याने महाराष्ट्र भूमीला संघर्षाचाही प्रदीर्घ इतिहास आहे. म्हणून मराठी माणूस या नात्याने महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रत्येकाला संघर्षाचीही तयारी ठेवावी लागेल," असे रोहित पवारांनी म्हटले.

Web Title: "We are not surprised by the raid...:, Supriya Sule's reaction on Baramati Agro raid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.