आषाढीसाठी आम्ही सज्ज : विश्वास नांगरे-पाटील

By admin | Published: June 23, 2017 05:58 PM2017-06-23T17:58:12+5:302017-06-23T18:32:47+5:30

-

We are ready for auspiciousness: trust Nangre-Patil | आषाढीसाठी आम्ही सज्ज : विश्वास नांगरे-पाटील

आषाढीसाठी आम्ही सज्ज : विश्वास नांगरे-पाटील

Next

आॅनलाइन लोकमत 
पंढरपूर दि 23 -  आळंदीपासून मी आमच्या सहकाऱ्यांसह सायकल वारी करीत पालखी विसावा व मुक्कांच्या ठिकाणांची पाहणी, बंदोबस्ताचा आढावा घेतला आहे. ४ जुलै रोजी होणाऱ्या आषाढी सोहळ्याच्या निमित्ताने प्रथमच हायटेक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून एकूण सहा हजारांपेक्षा जास्त पोलीस अधिकारी, कर्मचारी असतील़ शिवाय विविध फोर्सही बंदोबस्तासाठी कार्यरत असतील, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली़
आषाढी वारीच्या निमित्ताने पोलीस बंदोबस्ताचा आढावा शुक्रवारी त्यांनी घेतला़

त्यानंतर पत्रकारांना पोलीस बंदोबस्ताबद्दल सविस्तर माहिती देताना विश्वास नांगरे-पाटील म्हणाले, पंढरपूर शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे, वाहतुकीस अडथळा करणारे हॉकर्से, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात येणार आहे़ दहशतवादी हल्ले हे वाहनांच्या माध्यमातून होत असल्याने आम्ही वाहनांची कसून तपासणी करणार आहोत़ शिवाय लॉज, धर्मशाळा, हॉटेल यांची तपासणी करण्यात येत आहे़ नदीपात्रात वाळू उपशामुळे जे खड्डे पडले आहेत, ते बुजविण्याच्या सूचना दिल्या आहेत़ ठिकठिकाणी बॅरेकेटिंग लावण्यात येणार आहे़ वारीदरम्यान महिलांची छेडछाड रोखण्यासाठी स्पेशल स्कॉड तैनात केले आहेत़ भुरट्या चोरांच्या बंदोबस्तासाठी त्यांना ओळखणारे आणि निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे़ ते सध्या पालख्यांसोबत आहेत़ यंदाच्या वारीसाठी पूर्ण तयारीनिशी पोलीस कार्यरत असतील, असे त्यांनी सांगितले़


आळंदीपासून सायकल वारी केली़ यामुळे पालखी विसावा आणि मुक्काच्या ठिकाणाची पाहणी करता आली़ तेथील नगराध्यक्ष, सरपंच आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन योग्य त्या सूचना केल्या आहेत़ सातारा जिल्ह्यापेक्षा सोलापूर जिल्ह्यातील पुलावरील कठडे नादुरस्त आहेत़ शिवाय तेथे अश्लिल काहीतरी लिहिले आहे़ ते पुसून कठडे दुरुस्तीबाबतची विनंती जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे़


पंढरपुरात वारीदरम्यान रिक्षाचालकांकडून मोठ्या प्रमाणात भाविकांची लूट होते, मात्र यावेळी तसे होणार नाही, याची काळजी आम्ही घेतली आहे़ एकूणच आषारी वारीसाठी विविध ठिकाणाहून येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेची पोलीस प्रशासनाकडून सर्वोपतरी काळजी घेण्यात येणार असल्याचे विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले़
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, तालुका पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, शहर पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्यासह पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


असा असेल पोलीस बंदोबस्त
आषाढी यात्रा कालावधीत भाविकांच्या सुरक्षेसाठी १ पोलीस अधीक्षक, ७ अप्पर पोलीस अधीक्षक, १४ पोलीस उपअधीक्षक, ५९ पोलीस निरीक्षक, २०३ पोलीस उपनिरीक्षक, २७ महिला पोलीस उपनिरीक्षक, ३ हजार २१५ पोलीस कर्मचारी, ५५५ महिला पोलीस कर्मचारी, राखीव पोलीस दलाचे ५० कर्मचारी तसेच वाहतूक शाखेसाठी ३ पोलीस उपअधीक्षक, १० पोलीस निरीक्षक, २५ पोलीस उप-निरीक्षक, ४२० पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. घातपाताच्या घटना रोखण्यासाठी बॉम्ब शोधक पथक, श्वान पथक तसेच पोलीसांचे विशेष पथक नेमण्यात आले आहे. याबरोबर महिलांच्या सुरक्षेसाठी महिलांचे विशेष पथक, गर्दीवर नियंत्रण राखण्यासाठी सी. सी. ट़ व्ही़ कॅमेरे व आवश्यक ठिकाणी प्रखर प्रकाशाची सोय केली जाणार आहे. तसेच शहरात तीन झोन तयार करण्यात येणार आहेत़ एस़ आऱ पी़ एफ़ च्या ३ तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. तसेच १ हजार ४०० पुरुष होमगार्ड तर २०० महिला होमगार्ड नेमण्यात येणार आहेत. वारी कालावधीत नेमलेल्या पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या निवासाची सोय, आरोग्याची काळजीही घेतली जाणार असल्याचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले.

Web Title: We are ready for auspiciousness: trust Nangre-Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.