Bullock Cart Race : बैलगाडा शर्यतीचा निकाल आमच्या बाजुने लागले अशी खात्री - महेश लांडगे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 12:34 PM2022-11-24T12:34:36+5:302022-11-24T12:40:22+5:30
Bullock Cart Race And Mahesh Landge : बैलगाडा शर्यतीच्या संदर्भात आज सुप्रीम कोर्टात अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने यासाठी चांगले वकील दिले आहेत.
महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींबाबत (Bullock Cart Race) आज सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठासमोर (Supreme Court) सुनावणी होणार आहे. याबाबत घटनापीठ अंतिम निर्णय काय देणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. याच दरम्यान आमदार महेश लांडगे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. बैलगाडा शर्यतीचा निकाल आमच्या बाजुने लागले अशी खात्री असल्याचं म्हटलं आहे. तसेच आमच्या पाठीमागे ही फार मोठी ताकद आहे. कायद्याच्या चौकटीत राहून ही स्पर्धा व्यवस्थित पार पडेल हा विश्वास असल्याचं सांगितलं
बैलगाडा शर्यतीच्या संदर्भात आज सुप्रीम कोर्टात अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने यासाठी चांगले वकील दिले आहेत. वेगवेगळ्या राज्यांनीही याबाबत चांगले वकील दिले असून देवेंद्र फडणवीस यांनी यासगळ्यात विशेष लक्ष घातले. अखिल भारतीय बैलगाडा संघटनेकडून दाखल झालेल्या केसचा संपूर्ण खर्च हा राज्य सरकार नाही तर स्वत: देवेंद्र फडणवीस करणार आहेत.
"आमच्या पाठीमागे ही फार मोठी ताकद आहे. कायद्याच्या चौकटीत राहून ही स्पर्धा व्यवस्थित पार पडेल हा विश्वास आम्हाला आहे त्यामुळे निकाल आमच्याच बाजूने लागेल हा विश्वास आहे आमचे वकील, पशु विभागाचे लोक आले आहेत, जे जे राज्य सरकार म्हणून करता येईल ते सर्व आम्ही केलं आहे. या केसमध्ये वेळो वेळी सगळे अपडेटस हे स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला देत आले आहेत" असं महेश लांडगे यांनी म्हटलं आहे.
एखाद्या स्पर्धेत गोळीबार झाला त्याचा येथे संबंध नाही, तिथं जी घटना घडली तिथं बैलगाडी शर्यत नाही तर वैयक्तिक वादातून ही घटना घडली. लोकांसमोर सत्य आलं पाहिजे. ही स्पर्धा सुरू राहण्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागतोय, कारण ही आपली परंपरा आहे असं देखील आमदार महेश लांडगे यांनी म्हटलं आहे. माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"