आम्ही जात-पात मानत नाही पण धर्म मानतो - उद्धव ठाकरे
By admin | Published: August 21, 2016 01:19 PM2016-08-21T13:19:08+5:302016-08-21T13:39:08+5:30
आम्ही जात-पात मानत नाही पण धर्म मानतो, अधर्म होऊ नये यासाठी धर्माचे आचरण महत्वाचे असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुण्यात केले आहे.
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २१ : आम्ही जात-पात मानत नाही पण धर्म मानतो, अधर्म होऊ नये यासाठी धर्माचे आचरण महत्वाचे असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुण्यात केले आहे. डॉ.कुमार सप्तर्षी यांच्या अमृत महोत्सवानिमित्त उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सप्तर्षी यांचा गौरव करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नरेंद्र चपळगावकर, गिरीष बापट यांच्यासह अनेक राजकीय दिग्गजांची उपस्थिती होती. सप्तर्षी यांनी सत्ताधाऱयांचे कोडकौतुक केले नाही, तसे केले असते तर आत्तापर्यंत राज्यपाल झाले असते असेही ते म्हणाले.
मी इथे कसा याचे अनेकाना आश्चर्य पण नाती असतात ऋणानूबध असतात मतभेद असतात आहेत. ते जातपातधर्म मानत नाहीत आम्ही जातपात नाही मानत पण धर्म मानतो कारण तो नसेल तर अधर्म माजेन याची भिती वाटते. कूमार एक आदर्श आहेत विचाराशी कधी प्रतारणा केली नाही त्यासाठी आलो
यावेळी बोलताना राज ,उद्धव यांच्या संबंधावर सप्तर्षी यांनी उद्धव ठाकरेंना मार्मिक सल्ला दिला. ते म्हणाले थोरल्या भावानं धाकट्या भावाच्या खोड्या सहन करायच्या असतात.