आम्हाला कोणाच्या पाठिंब्याची गरज नाही
By admin | Published: October 5, 2014 02:10 AM2014-10-05T02:10:30+5:302014-10-05T02:10:30+5:30
आता भाजपा महाराष्ट्रात स्वबळावर निवडणुकीच्या मैदानात उतरली आह़े आपल्या काय अपेक्षा आहेत़ तुम्हाला किती जागा जिंकू, असा विश्वास वाटतो़
Next
>प्रश्न : आता भाजपा महाराष्ट्रात स्वबळावर निवडणुकीच्या मैदानात उतरली आह़े आपल्या काय अपेक्षा आहेत़ तुम्हाला किती जागा जिंकू, असा विश्वास वाटतो़
उत्तर : भाजपा-शिवसेना युती तुटली़ शिवसेना बाहेर पडली, आम्ही हा निर्णय अनिच्छेने का होईना आता मान्य केला आह़े एका विशिष्ट अंकाभोवती महायुतीच्या जागावाटपाची चर्चा फिरत होती. शिवसेना 151 जागांचा आग्रह सोडायला तयार नव्हती; तर आमची 13क् पेक्षा कमी जागा घेण्याची तयारी नव्हती़ उमेदवारी अर्ज भरायला केवळ 24 तासांचा अवधी शिल्लक होता़ वेळ कमी होता. त्यामुळे चर्चा आणखी पुढे रेटता येणोही शक्य नव्हत़े सोबतच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय), स्वाभिमानी शेतकरी संघटना, आणि शिवसंग्राम अशा घटक पक्षांना वा:यावर सोडून जाणो बरोबर नाही, असे आमचे मत पडले. भाजपा 255 जागा आपल्या चिन्हावर लढवणार आह,े तर उर्वरित 33 जागा मित्र पक्षांसाठी सोडल्या आहेत़ पंचरंगी लढत होणार असल्याने आजची महाराष्ट्रातील स्थिती पूर्णत: वेगळी आह़े पण जनतेचा मूड भाजपाकडे आह़े त्यामुळे भाजपाने स्वबळावर 18क् आकडा पार केला तरी मला आश्चर्य वाटणार नाही़
प्रश्न : तुमचे स्वत:चे सव्रेक्षण काय म्हणते?
रुडी : कुठल्याही सव्रेक्षणाबाबत मला ठाऊक नाही़ मी कुठल्याही सव्रेक्षणावरून ठोकताळे बांधत नाही़ पण महाराष्ट्रातील जनतेला यावेळी राज्यात एका पक्षाचे स्थिर आणि सक्षम सरकार हवे आह़े
प्रश्न : आपल्या पक्षाचा मुद्दा काय?
रुडी : गत 15 वर्षातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या सत्ताकाळातील भ्रष्टाचार हा आमचा प्रमुख निवडणूक मुद्दा आह़े पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वसमावेशक नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्रात भ्रष्टाचारमुक्त, विकासाभिमुख सरकार देऊ इच्छितो आणि महाराष्ट्रातील जनता योग्य भाजपाच्या रूपातील सक्षम पर्याय निवडतील, असा आम्हाला विश्वास वाटतो़
प्रश्न : शिवसेनेने मोदींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता. परंतु तुम्ही मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून उद्धव ठाकरे यांना का स्वीकारले नाही?
रुडी : हे संपूर्णपणो निराधार आहे. शिवसेनेसोबत झालेल्या आमच्या कोणत्याही बैठकीमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराबाबत कधी चर्चा झाली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून स्वीकारण्याचा वा नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
महाराष्ट्रात भाजपा स्पष्ट बहुमत मिळवून स्वबळावर आपले सरकार स्थापन करणार असा आमचा दृढविश्वास आहे. आम्हाला सरकार स्थापण्यासाठी या किंवा त्या बाजूच्या आघाडीतील कोणत्याही पक्षांच्या पाठिंब्याची गरज पडणार नाही.
सर्वत्र पंचरंगी लढती होणार असल्याने आजची महाराष्ट्रातील स्थिती पूर्णत: वेगळी आह़े पण जनतेचा मूड भाजपाच्या बाजूने आह़े त्यामुळे भाजपाने स्वबळावर 18क् चा आकडा पार केला तरी मला आश्चर्य वाटणार नाही़