धर्माचा तर्कशुद्ध अभ्यास करायला हवा

By Admin | Published: June 27, 2016 01:07 AM2016-06-27T01:07:17+5:302016-06-27T01:07:17+5:30

धर्म हा तर्कसुसंगत असला तरच पुढील पिढी तो योग्यप्रकारे जाणून घेऊ शकेल.

We have to practice the rational study of religion | धर्माचा तर्कशुद्ध अभ्यास करायला हवा

धर्माचा तर्कशुद्ध अभ्यास करायला हवा

googlenewsNext


पुणे : धर्म हा तर्कसुसंगत असला तरच पुढील पिढी तो योग्यप्रकारे जाणून घेऊ शकेल. व्यापार म्हणून सुरू असलेली धर्मस्थळे अंधश्रद्धा पसरवितात. त्यामुळे तर्कशुद्ध पद्धतीने धर्माचा विचार करून चमत्काराशिवाय प्रत्येकाला धर्म जगता आला पाहिजे. धर्मस्थळांनी धर्म समजावून सांगणारी संस्कार केंद्र सुरू केली तर या केंद्रातून धर्माचा तर्कशुद्ध अभ्यास केला जाईल, असे मत ज्येष्ठ विधिज्ञ भास्करराव आव्हाड यांनी व्यक्त केले.
लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे मंदिराच्या ११९व्या वर्धापनदिनानिमित्त लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई स्मृती पुरस्कार माहेर संस्थेच्या ल्युसी कुरियन, संशोधक मनीषा दाते आणि ममता फाउंडेशनच्या शिल्पा बुडुख यांना रविवारी प्रदान करण्यात आला. महर्षीनगर येथील शिवशंकर सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा झाला.
अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, आमदार माधुरी मिसाळ, महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मुकारी अलगुडे, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, बाळासाहेब दाभेकर, दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. एन. डी. पाटील, कार्याध्यक्ष युवराज गाडवे, उत्सवप्रमुख अंकुश काकडे, खजिनदार बी. एम. गायकवाड उपस्थित होते.
समाज आत्ममग्न झाला आहे. आपण आजूबाजूचे जग पाहिले तर बरेच प्रश्न व समस्या दिसतील. आपण एकत्रित येऊन काम केले तर हे प्रश्न नक्कीच सुटतील. समाजकार्यात आपण खारीचा वाटा उचलला पाहिजे आणि त्याची सुरुवात आपल्या घरापासून केली पाहिजे.
- मृणाल कुलकर्णी
एखादी व्यक्ती घडत असते, तेव्हा लहानपणापासून त्या व्यक्तीवर चांगल्या गोष्टींचे संस्कार घडतात. आई-वडील, शिक्षक, मित्र-मैत्रिणी व आजूबाजूच्या वातावरणातून ती व्यक्ती घडते. समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तींकडून सामाजिक समतोल राखण्याचे काम सुरू असून आपणही हातभार लावायला हवा.
- माधुरी मिसाळ, आमदार

Web Title: We have to practice the rational study of religion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.