है तैय्यार हम...! सोलापूरात राज्यातील ६२९ महिला पोलिसांचे प्रशिक्षण पूर्ण

By Appasaheb.dilip.patil | Published: August 5, 2017 11:11 AM2017-08-05T11:11:59+5:302017-08-05T11:12:07+5:30

सोलापूर दि ५ : बी रेडी़़़स्टार्ट! असा आदेश कानी पडताच त्याचे आम्ही तंतोतंत पालन करायचो़़़ रोज भल्या पहाटेपासूनच सुरू व्हायचे आमचे प्रशिक्षण, प्रथम धावणे, नंतर विविध प्रकारचे व्यायाम, मग कवायत झाल्यानंतर घामेघूम व्हायचो आम्ही...अगदी थकून जायचो़़़़त्यानंतर सुरू व्हायचे एक पोलीस म्हणून समाजाची सेवा करताना खरोखरच काय करायला हवे याचे लेक्चर...आता हे सारं झालं. दहा महिन्यांचं प्रशिक्षण पूर्ण केलं आणि आता आम्ही सज्ज आहोत...‘सद्रक्षण’ करण्याला.

We have prepared ourselves ...! Complete training of 629 women police officers in Solapur | है तैय्यार हम...! सोलापूरात राज्यातील ६२९ महिला पोलिसांचे प्रशिक्षण पूर्ण

है तैय्यार हम...! सोलापूरात राज्यातील ६२९ महिला पोलिसांचे प्रशिक्षण पूर्ण

googlenewsNext


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ५ : बी रेडी़़़स्टार्ट! असा आदेश कानी पडताच त्याचे आम्ही तंतोतंत पालन करायचो़़़ रोज भल्या पहाटेपासूनच सुरू व्हायचे आमचे प्रशिक्षण, प्रथम धावणे, नंतर विविध प्रकारचे व्यायाम, मग कवायत झाल्यानंतर घामेघूम व्हायचो आम्ही...अगदी थकून जायचो़़़़त्यानंतर सुरू व्हायचे एक पोलीस म्हणून समाजाची सेवा करताना खरोखरच काय करायला हवे याचे लेक्चर...आता हे सारं झालं. दहा महिन्यांचं प्रशिक्षण पूर्ण केलं आणि आता आम्ही सज्ज आहोत...‘सद्रक्षण’ करण्याला.
        सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर केगाव हद्दीत सोलापूर विद्यापीठाच्या बाजूला महिलांसाठी पोलीस प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहे़ याठिकाणी प्रशिक्षण घेतलेल्या ६२९ नव्या दमाच्या महिला पोलीस कर्मचाºयांची ही भावना. ‘लोकमत’शी बोलताना अनेकांनी आपले अनुभव सांगितले अन् कोणत्याही स्थितीला सामोरे जाऊन नागरिकांचे रक्षण करण्यासाठी सज्ज झाल्याची ग्वाही दिली.
महिला पोलिसांचे हे प्रशिक्षण केंद्र ३५९ एकरावर वसलेले असून १९९९ मध्ये कार्यरत झाले़ या पोलीस केंद्रात आतापर्यंत २१ बॅचच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले़  एकंदरीत १९ वर्षांच्या कालावधीत महिला प्रशिक्षणार्र्थींची १ बॅच व पुरुष प्रशिक्षणार्थ्यांच्या १८ बॅचेसने या ठिकाणी यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केले आहे़ मागील सत्र क्रमांक २० मध्ये एकूण ११३१ प्रशिक्षणार्थ्यांची मोठी बॅच झाली़ आतापर्यंत ८२०१ प्रशिक्षणार्थी या ठिकाणी प्रशिक्षण घेऊन आपल्या जिल्ह्यात सेवा बजावित आहेत.
-----------------------------
हे शिक्षण दिले जाते़़़
च्या प्रशिक्षण केंद्रातील आंतरवर्ग क्लासमध्ये ८ विषय शिकविण्यात येतात़ यात भा.दं.वि.दंड संहिता, सीआरपीसी, बीपी अ‍ॅक्ट, पुरावा कायदा , महिलांवरील व बालकांवरील अत्याचाराविरुद्ध कायदा इत्यादी शिक्षण दिले जाते. त्याचप्रमाणे सायबर क्राईम, फॉरेन्सीक सायन्स, फिंगर प्रिंट, केस स्टडी इत्यादी विषयाची परिपूर्ण माहिती दिली जाते़ यासाठी केंद्रात २२ पोलीस निरीक्षक, २ सहायक पोलीस निरीक्षक, १ पोलीस उपनिरीक्षक, २० विधी निदेशक तसेच सेवानिवृृत्त पोलीस अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रशिक्षणादरम्यान प्रत्येक आठवड्याला योगा प्रशिक्षण, धर्म संहिष्णुता, वाहतूक नियंत्रण, लाचलुचपत प्रतिबंध, फिंगर प्रिंट, डॉग स्कॉड इत्यादीबाबत गेस्ट लेक्चरही देण्यात येते़
-------------------------------
बुधवारी दीक्षांत संचलन
च्पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर येथील पोलीस प्रशिक्षणार्थी सत्र २१ वा दीक्षांत संचलन कार्यक्रम बुधवार ९ आॅगस्ट रोजी सकाळी ८ वाजता होणार आहे़ यासाठी अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) डॉ़ प्रज्ञा सरवदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे़ यासाठी पोलीस प्रशिक्षण केंद्रात सर्व तयारी करण्यात येत असल्याची माहिती उपप्राचार्य पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़ 
------------------------
बाह्य प्रशिक्षणावरही दिला जातो भऱ़़
च्नवप्रविष्ठ प्रशिक्षणार्थी यांना बाह्यवर्ग प्रशिक्षण देण्यामागे मूळ हेतू असा की त्यांना त्यांची शारीरिक क्षमता वाढवून पोलीस क्षेत्रातील शिस्त,शस्त्र कवायत इत्यादी अंगीकारुन त्याचा उपयोग भविष्यात निर्माण होणाºया संकटावर मात करण्यासाठी नवप्रविष्ठ प्रशिक्षणार्थींना बाह्यवर्ग प्रशिक्षणही देण्यात आले आहे़ सर्व प्रशिक्षणार्र्थींचा दिवस सकाळी ६ वाजल्यापासून सुरू होतो़ सकाळी ६:१५ ते ८:०० वाजेपर्यंत शारीरिक प्रशिक्षण दिले जाते. यात फिजिकल ट्रेनिंग, कमांडो ट्रेनिंग, जंगल ट्रेनिंग, वेपन ट्रेनिंग, फूट ड्रील, रेग्युलर परेड, वेपन टॅक्टीस आदींचा समावेश आहे
-----------------
केगाव येथील प्रशिक्षण केंद्रात आतापर्यंत ८२०१ प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे़ यंदाची ही २१ वी बॅच आहे़ या बॅचमधील ६२९ महिला पोलिसांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे़ त्यांचा बुधवार ९ आॅगस्ट रोजी दीक्षांत संचलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे़
- कविता नेरकर-पवार, प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र

Web Title: We have prepared ourselves ...! Complete training of 629 women police officers in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.