'आम्हाला १७५ आमदारांचा पाठिंबा, बहुमत चाचणी हे आता केवळ सोपस्कार', एकनाथ शिंदेंचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 11:24 AM2022-07-01T11:24:30+5:302022-07-01T11:25:57+5:30
Eknath Shinde: शपथविधी आटोपून पहाटे गोव्यात आलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहुमत चाचणी हे आता केवळ सोपस्कार उरले आहेत असे म्हटले असून १७५ आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे, असा दावा केला आहे.
पणजी - शपथविधी आटोपून पहाटे गोव्यात आलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहुमत चाचणी हे आता केवळ सोपस्कार उरले आहेत असे म्हटले असून १७५ आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे, असा दावा केला आहे.
शिंदे म्हणाले की, 'आम्ही बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांचे हिंदुत्व पुढे नेत आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला अन्यायाविरुद्ध लढायला शिकवले आणि आवाज उठवायला शिकवले. मी मातोश्रीवर कधी जाणार हे वेळ आली की जनतेला समजेल. शिवसेना आमदारांचे प्रश्न सोडवले जातील. सेना आमदार असलेल्या मतदारसंघांमध्ये पुरेसा निधी देणे तसेच त्या मतदारसंघातील प्रलंबित कामे मार्गी लावणे ही आता माझी जबाबदारी आहे.'
दोनापॉल येथील ताज कन्वेंशन या पंचतारांकित हॉटेलमध्ये शिंदे गटाचे बंडखोर आमदार आहेत. शिंदे हे आता त्यांना सोबत घेऊनच मुंबईला जाणार आहेत.दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सकाळी शिंदे यांची हॉटेलवर भेट घेऊन मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.