शिंदे मुख्य़मंत्री होणार हे आम्हाला माहिती होते, पण फडणवीसांना नव्हते; नितिन देशमुखांचे मोठे गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 03:17 PM2023-06-17T15:17:26+5:302023-06-17T15:18:17+5:30
उद्धव ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर यांनी देशमुख व कैलास घाडगे-पाटील यांची मुलाखत घेतली. यामध्ये त्यांनी याचा खुलासा केला आहे. अकोल्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुखांनी गुवाहाटीहून महाराष्ट्र गाठले होते.
विधानसभेत विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करून एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन सुरतला निघाले होते. पैकी काही आमदार वाटेत तर काही हॉटेलमधून माघारी आले. तोवर राज्यात मोठा राजकीय भूकंप घडला होता. शिंदेंच्या गोटातून महाराष्ट्रात आलेले आमदार नितिन देशमुख यांनी हे होणार असल्याची महिनाभर आधीच कल्पना होती असा गौप्यस्फोट केला आहे.
उद्धव ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर यांनी देशमुख व कैलास घाडगे-पाटील यांची मुलाखत घेतली. यामध्ये त्यांनी याचा खुलासा केला आहे. अकोल्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुखांनी गुवाहाटीहून महाराष्ट्र गाठले होते.
देशमुख यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार आहेत, याची कल्पना एका महिनाच आम्हाला आली होती. तेव्हा कदाचित देवेंद्र फडणवीस यांना ही माहिती नसेल. मात्र, स्वत: एकनाथ शिंदेंनीच मला ते मुख्यमंत्री होणार आहेत, असे सांगितले होते, असा दावा देशमुख यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीसांना बंड आणि सत्तांतर होईल हे माहिती होते, परंतू मुख्यमंत्री कोण होईल हे माहिती नव्हते, असे देशमुख म्हणाले.
देवेंद्र फडणवीस जे सांगतायत की शिंदेंना त्यांनी मुख्यमंत्री बनविले हे पूर्णपणे खोटे आहे. कारण केवळ अमित शाह आणि शिंदे या दोघांनाच हे माहिती होते, असा गौप्यस्फोट देशमुख यांनी केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होताच पहिल्या सहा महिन्यांत कटकारस्थाने सुरु झाली होती, असे देशमुख म्हणाले.
उद्धव ठाकरेंवर आमदारांना भेटायचे नाहीत असा आरोप केलेला चुकीचे आहे. आम्ही जेव्हा पहिल्यांदा आमदार झालेलो तेव्हा ते आम्हाला वेळ द्यायचे, असे कैलास पाटील यांनी सांगितले.