'आम्ही भाजपची साथ सोडली, हिंदूत्व नाही; भाजप म्हणजे हिंदूत्व नाही'- उद्धव ठाकरे कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 06:26 PM2023-02-12T18:26:44+5:302023-02-12T18:26:50+5:30

उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंची हजेरी, यावेळी त्यांनी सोबत येण्याचे आवाहन केले.

'We left BJP, not Hinduism; BJP is not Hinduism'- Uddhav Thackeray said | 'आम्ही भाजपची साथ सोडली, हिंदूत्व नाही; भाजप म्हणजे हिंदूत्व नाही'- उद्धव ठाकरे कडाडले

'आम्ही भाजपची साथ सोडली, हिंदूत्व नाही; भाजप म्हणजे हिंदूत्व नाही'- उद्धव ठाकरे कडाडले

Next


मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत उत्तर भारतीयांसोबत बैठक घेतली. या बैठकीतून त्यांनी उत्तर भारतीयांच्या पाठिंब्यासाठी आवाहन केले. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, 'मी आज तुमची साथ मागायला आलो आहे. तुम्ही अनेक पिढ्यांपासून इथे राहता. तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील. हा मेळावा नाही, बैठक आहे. मेळाव्यासाठी मैदान अपुरं पडेल. मी आपलं नातं मजबूत करण्यासाठी आलो आहे. आपण एकमेकांना हिंदू मानत असू, तर उत्तर भारतीय आणि मराठी वेगळे व्हायला नको,' असं उद्धव ठाकरे म्हणाले.

यावेळी त्यांनी भाजपवरही जोरदार टीका केली. ते पुढे म्हणतात, 'गेल्या 25-30 वर्षांपासून आमची युती होती, आम्ही निभावली पण त्यांनी तोडली. आमची त्या पक्षासोबत आपुलकी होती, पण ते वर जाऊन बसले आणि त्यांनी आम्हाला दूर केले. 95 पूर्वी शिवसेना आणि भाजपला कुणी साथ देत नव्हते, आमच्यावर धार्मिक असल्याचा ठपका होता. तेव्हा माझ्या वडिलांनी तत्कालीन पंतप्रधनांना पाठिंबा दिला होता. बाळासाहेबांनी कधीच उत्तर भारतीयांचा किंवा मुस्लिमांचा द्वेष केला नाही. जो देशाच्या विरोधात होता, त्यालाच बाळासाहेबांनी विरोध केला.'

'आज आम्ही युती तोडली, कारण 2014 मध्ये त्यांनी पहिल्यांदा युती तोडली. तेव्हा आम्ही हिंदू होतो, आजही आहोत आणि उद्याही हिंदूच राहू. आम्ही त्यांची साथ सोडली, पण आम्ही हिंदूत्व सोडले नाही. भाजप म्हणजे हिंदूत्व नाही. ते बोलणार आणि आम्ही ऐकणार, असं चालणार नाही. त्यांचे हिंदूत्व आम्ही मानायला तयार नाही. इतरांमध्ये भांडण लावून देण्याचे काम ते करतात आणि तशाप्रकारचे हिंदूत्व आम्हाला मान्य नाही,' असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

Web Title: 'We left BJP, not Hinduism; BJP is not Hinduism'- Uddhav Thackeray said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.