...आम्ही एकत्रच येणार आहोत; प्रकाश आंबेडकरांचं शरद पवारांच्या भेटीवर मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 11:15 AM2024-01-01T11:15:06+5:302024-01-01T11:22:35+5:30

इंडिया आघाडीत आम्हाला कधी प्रवेश द्यायचा हे त्यांनी ठरवायचे आहे असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

...we must come together; Prakash Ambedkar big statement on Sharad Pawar meeting | ...आम्ही एकत्रच येणार आहोत; प्रकाश आंबेडकरांचं शरद पवारांच्या भेटीवर मोठं विधान

...आम्ही एकत्रच येणार आहोत; प्रकाश आंबेडकरांचं शरद पवारांच्या भेटीवर मोठं विधान

पुणे - Prakash Ambedkar on Sharad Pawar ( Marathi News ) राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. अलीकडेच प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांची भेट घेतल्याचे वृत्त आले. त्या भेटीवर पहिल्यांदाच प्रकाश आंबेडकर यांनी थेट भाष्य केले आहे. आम्ही लवकरच एकत्र येणार आहोत. त्यामुळे भेटीचा सिलसिला सुरू राहील असे सूचक विधान प्रकाश आंबेडकरांनी केले आहे. 

पुण्यात भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी प्रकाश आंबेडकर पोहचले होते. यावेळी पत्रकारांनी शरद पवारांच्या भेटीवर प्रश्न विचारताच प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आम्ही एकत्र येणारच आहोत, अनौपचारिक, औपचारिक कुठे ना कुठे, कधी ना कधी भेट होणारच आहे. त्यामुळे तर्कवितर्क लढवण्यात आता काही अर्थ राहिला नाही. ज्यावेळी आम्ही पत्र लिहित नव्हतो. इंडिया आघाडीत सहभागी करा. त्यात राष्ट्रवादीही आहे. शिवसेनाही आहे. त्यामुळे वारंवार भेटीगाठी होत राहणार आहे. भेट झाली तर निश्चितपणे आपल्याला सांगेल.

तर इंडिया आघाडीत आम्हाला कधी प्रवेश द्यायचा हे त्यांनी ठरवायचे आहे.आमच्यासाठी अजून तरी दार बंद आहेत. प्रत्येकाच्या वैयक्तिक सहमतीचा प्रश्न नाही. इंडिया आघाडीचा प्रश्न आहे. ज्यादिवशी आम्ही इंडिया आघाडीत सहभागी झालो त्यानंतर या पंतप्रधानांनी गेल्या १० वर्षात देशाला कसं खोकलं केलेले आहे याचा आराखडा आम्ही मांडू असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं. 

दरम्यान, सत्तेत येणे, संविधान वाचवणे हा आमचा नवीन वर्षाचा संकल्प आहे. त्याचसोबत मराठा आणि ओबीसी समाजात जे भांडण लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. ते वाढणार नाही आणि त्यातून योग्य तोडगा निघेल. तसेच महाराष्ट्राची शांतता जशी आहे तशी राहिले हे पाहणे हादेखील आमचा नव्या वर्षाचा संकल्प आहे असं आंबेडकरांनी सांगितले. 

भाजपाचा पराभव करण्यासाठी इंडिया आघाडी
२०२४ या नव्या वर्षांत १८ व्या लोकसभा निवडणुकांचा फड रंगणार आहे. त्यासोबतच महाराष्ट्रासह आठ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे हे वर्ष राजकीय धामधुमीचे राहणार आहे. लोकसभेवेळी काँग्रेस वा कोणताही विरोधी पक्ष एकट्याने भाजपचा वारू रोखू शकत नसल्याची जाणीव असल्याने २८ मित्रपक्षांनी एकत्र येत इंडिया महाआघाडीची स्थापना केली. या महाआघाडीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश होणार का याकडे राज्यातील सर्वांचे लक्ष लागलं आहे.

Read in English

Web Title: ...we must come together; Prakash Ambedkar big statement on Sharad Pawar meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.