विकास हवा, नको नुसता बोभाटा; नाही तर आहेच ‘नोटा’; गेल्यावेळी हा पर्याय होता दुसऱ्या स्थानी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 08:50 AM2024-10-25T08:50:35+5:302024-10-25T08:52:06+5:30

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ७ लाखांहून अधिक मतदारांनी नोटा बटण दाबले होते. हे प्रमाण एकूण मतांच्या १.३५ टक्के एवढे होते.

We need development, not just talk; If not, there is 'Nota'; Last time this option was in second place | विकास हवा, नको नुसता बोभाटा; नाही तर आहेच ‘नोटा’; गेल्यावेळी हा पर्याय होता दुसऱ्या स्थानी

विकास हवा, नको नुसता बोभाटा; नाही तर आहेच ‘नोटा’; गेल्यावेळी हा पर्याय होता दुसऱ्या स्थानी

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: आपल्या मतदारसंघात उभ्या असलेल्या उमेदवारांपैकी एकही उमेदवार निवडून देण्याच्या योग्यतेचा नाही असे वाटल्यास मतदारांसाठी नोटाचा पर्याय आहे. लोकसभा असो की विधानसभा निवडणूक काही वर्षांपासून नोटा अर्थात  (नन ऑफ द अबोव्ह) या पर्यायाचा वापर वाढला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ७ लाखांहून अधिक मतदारांनी नोटा बटण दाबले होते. हे प्रमाण एकूण मतांच्या १.३५ टक्के एवढे होते. लातूर ग्रामीण आणि सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगाव येथे नोटाचा पर्याय दुसऱ्या स्थानी होता. हे प्रमाण एकूण मतांच्या १.३५ टक्के एवढे होते. लातूर ग्रामीण आणि सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगाव येथे नोटाचा पर्याय दुसऱ्या स्थानी होता.

या मतदारसंघात नोटास सर्वाधिक मते

  • लातूर ग्रामीण         २७,५०० 
  • पलूस-कडेगाव          २०,६३१  
  • पनवेल         १२,३९९ 
  • जोगेश्वरी पूर्व         १२,०३१ 
  • बोरिवली         १०,०९५ 
  • विक्रमगड         ८४९५  
  • पालघर        ७१३५  
  • मुरबाड        ६७८३ 
  • वरळी         ६३०५ 
  • कल्याण ग्रामीण         ६०९२


नोटाला कमी मते कुठे मिळाली?

  • नेवासा     ३१६  
  • गेवराई    ४७८  
  • परळी    ५६१  
  • कराड दक्षिण         ५८४  
  • पंढरपूर      ६३९  
  • हदगाव    ६८२ 
  • सांगोला     ७००  
  • लातूर शहर     ७२७  
  • इंदापूर     ७३१  
  • माजलगाव     ७८०

Web Title: We need development, not just talk; If not, there is 'Nota'; Last time this option was in second place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.