वृक्षवल्ली आम्ही सोयरे वनचरे...!

By admin | Published: September 11, 2016 04:00 AM2016-09-11T04:00:12+5:302016-09-11T04:00:12+5:30

मी देवळात नाही़ मी सर्वत्र आहे. अगदी झाडातही मी आहे..., असा संदेश देत, सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब (ता़ माढा) इथल्या पर्यावरणविषयक काम करणाऱ्या तरुणांनी चक्क कडुनिंबाच्या झाडालाच गणपती बनविले आहे़

We planted trees ...! | वृक्षवल्ली आम्ही सोयरे वनचरे...!

वृक्षवल्ली आम्ही सोयरे वनचरे...!

Next

शिवाजी सुरवसे,  सोलापूर
मी देवळात नाही़ मी सर्वत्र आहे. अगदी झाडातही मी आहे..., असा संदेश देत, सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब (ता़ माढा) इथल्या पर्यावरणविषयक काम करणाऱ्या तरुणांनी चक्क कडुनिंबाच्या झाडालाच गणपती बनविले आहे़ वृक्ष लागवडीचा आणि संवर्धनाचा संदेश देणारा हा इको फें्रडली गणपती उत्सुकतेचा आणि चर्चेचा विषय बनला आहे़
मोडनिंबमधील रेल्वे स्टेशन रोडवर संगनबसवेश्वर मठाजवळ लष्कर ए शिवबा प्रतिष्ठान संचलित वीर मराठा गणेशोत्सव मंडळाने ही गणेशाची मूर्ती बसविली आहे़ ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे...’ असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. वृक्ष हेच जीवनात सर्व काही आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न या मंडळाने केला आहे़
गतवर्षी या मंडळाने बाबूंच्या कामठ्यांपासून बाहुबली स्टाईलमध्ये दहा फुटांची गणपतीची मूर्ती बसविली होती़ दरवर्षी काहीतरी नवीन करणे आणि पर्यावरण जागृतीचे काम करणे हा उद्देश मंडळाने ठेवला आहे़
संतोष लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली समाधान घाडगे, जगदीश डांगे, रणजित सुरवसे,
किरण व्यवहारे, विजय परबत, धनाजी लादे, सोमनाथ माळी,
शीतल महाडिक, विजय बुरांडे, स्वाधीन थोरात यांच्या सहकाराने ही कल्पना मूर्त रूपात आल्याचे केदार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़

Web Title: We planted trees ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.