आमचं चुकलं हे मान्य करण्याचा मोठेपणा दाखवला पाहिजे; पंकजा मुंडेंची सूचक टिप्पणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 06:55 PM2019-12-11T18:55:19+5:302019-12-11T19:00:42+5:30

राज्य नेतृत्त्वावर भाजपा नेत्या पंकजा मुंडेंचा निशाणा

we should accept our mistakes with big heart says bjp leader pankaja munde indirectly hits out at devendra fadnavis | आमचं चुकलं हे मान्य करण्याचा मोठेपणा दाखवला पाहिजे; पंकजा मुंडेंची सूचक टिप्पणी

आमचं चुकलं हे मान्य करण्याचा मोठेपणा दाखवला पाहिजे; पंकजा मुंडेंची सूचक टिप्पणी

googlenewsNext

बीड: यशामध्ये भागीदार होता, तर पराभवाचीदेखील जबाबदारी घ्यायला हवी. आमचं चुकलं हे मान्य करण्याचा मोठेपणा दाखवला हवा, अशा सूचक शब्दांमध्ये भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडेंनी पक्षाच्या निवडणुकीतील कामगिरीवर भाष्य केलं आहे. पंकजा मुंडे उद्या गोपीनाथ गडावर मेळावा घेऊन समर्थकांना संबोधित करणार आहेत. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भाजपापासून काहीशा दूर गेलेल्या पंकजा मुंडे उद्या नेमकं काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. 

गोपीनाथ गडावरील मेळाव्याच्या पूर्वसंध्येला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडेंची आठवण सांगत पक्षाच्या राज्यातील नेतृत्त्वावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. 'गोपीनाथ मुंडेंना एखाद्याला जवळ करायचं असेल, तर त्यामुळे दूर जाऊ शकणाऱ्या व्यक्तीला ते आधी जवळ करायचे. अशाच प्रकारे त्यांनी माणसं जपली,' असं मुंडे म्हणाल्या.

भाजपा सोडणार याबद्दलच्या वावड्या कुठून उठवण्यात आल्या, याबद्दल मला कल्पना नाही. नाराज हा शब्दच मला आवडत नाही. मी कोणावर नाराज होऊ, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पक्षाकडून पद मिळवण्यासाठी दबावतंत्राचा वापर केल्या जात असल्याच्या दाव्यांचा त्यांनी पूर्णपणे इन्कार केला. मी ज्यांच्याकडे काही मागावं, अशी कोणतीही मोठी व्यक्ती माझ्या आजूबाजूला नाही. सध्या जे कोणी आजूबाजूला आहेत, त्यांच्यासोबत मी बरोबरीनं काम केलं आहे, असंदेखील त्या म्हणाल्या.

महाराष्ट्र विकास आघाडीवर सध्या भाजपाकडून जोरदार टीका केली जात आहे. मात्र पंकजा मुंडेंनी याबद्दल काहीशी वेगळी भूमिका मांडली. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या विचारधारा वेगळ्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टीका होते. मात्र आपण एखादी गोष्ट केली नसेल, तरच आपल्याला त्यावरुन टीका करण्याचा अधिकार असतो. शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाण्याआधी भाजपा आणि राष्ट्रवादीनं एकत्र येऊन सरकार स्थापन केलं होतं. त्यामुळे मला महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवर मला टीका करावीशी वाटत नाही, अशी भूमिका पंकजा मुंडेंनी मांडली. 
 

Web Title: we should accept our mistakes with big heart says bjp leader pankaja munde indirectly hits out at devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.