आम्ही एकत्र आल्यावर काय होते हे दाखवून दिले : जयंत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:58 PM2020-12-04T16:58:17+5:302020-12-04T17:00:59+5:30
Vidhan Parishad Election, Sangli , Twitter, jayantpatil राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना एकत्र आल्यावर काय घडते, हे या निकालाने दाखवून दिले. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, मध्यमवर्गीय यांच्यासोबत उच्चशिक्षित मतदारदेखील आमच्यासोबत ठामपणे उभे आहेत, हेच निकालातून सिद्ध होते, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी दिली.
सांगली : राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना एकत्र आल्यावर काय घडते, हे या निकालाने दाखवून दिले. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, मध्यमवर्गीय यांच्यासोबत उच्चशिक्षित मतदारदेखील आमच्यासोबत ठामपणे उभे आहेत, हेच निकालातून सिद्ध होते, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी दिली.
Heartiest congratulations to @ranjitdisale from Madha Taluka, Solapur who won the @TeacherPrize. You make every Indian so proud! May you keep inspiring and showing the light to many more. #GlobalTeacherPrizehttps://t.co/44i77Ppbpi
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) December 3, 2020
महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या सहा जाागंपैकी चार जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळविल्यानंतर जयंत पाटील यांनी ट्विट करीत मत मांडले. ते म्हणाले की, महािवकास आघाडीच्या उमेदवारांना या निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाले. जनमताचा हा कौल आम्ही नम्रपणे स्वीकारत आहोत.
या राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार व मध्यमवर्गीय यांच्यासोबतच उच्चशिक्षित मतदारदेखील महाविकास आघाडीच्या सोबत ठामपणे उभा आहे हेच या निकालाने सिद्ध होते.@NCPspeaks@ShivSena@INCMaharashtra@NCPArunLaad@satishchavan55@AsgaonkarJayant@wanjarri
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) December 4, 2020
हा विजय मी महाविकास आघाडीसाठी कष्ट घेणाऱ्या कार्यकर्त्यांना व मतदारांना समर्पित करतो. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस एकत्र आल्यानंतर काय होते, हेसुद्धा या निकालाने दाखवून दिले. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील व मित्रपक्षातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे तसेच महाराष्ट्रातील जनतेचे मी आभार मानतो.
महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विधानपरिषद निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळालं आहे. जनमताचा हा कौल आम्ही नम्रपणे स्विकारत आहोत. हा विजय मी महाविकास आघाडीसाठी कष्ट घेणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना आणि मतदारांना समर्पित करतो. @NCPspeaks@ShivSena@INCMaharashtra@NCPArunLaad@satishchavan55
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) December 4, 2020