"आदित्य ठाकरेंनी कुठून लढायचं ते आम्ही ठरवू, महाराष्ट्र त्यांचा.." - अंबादास दानवे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 06:18 PM2024-06-20T18:18:38+5:302024-06-20T18:19:03+5:30

आदित्य ठाकरे यांनी आता भिवंडीतून लढावं अशी टीका शिवसेना नेत्यांकडून होत होती. त्यावर अंबादास दानवेंनी पलटवार केला आहे. 

"We will decide from where Aditya Thackeray will fight, - Ambadas Danve target Shivsena | "आदित्य ठाकरेंनी कुठून लढायचं ते आम्ही ठरवू, महाराष्ट्र त्यांचा.." - अंबादास दानवे

"आदित्य ठाकरेंनी कुठून लढायचं ते आम्ही ठरवू, महाराष्ट्र त्यांचा.." - अंबादास दानवे

मुंबई - शिवसेना एकच आहे, ही गद्दारांची सेना आहे. स्वत:चं अपयश लपवण्यासाठी मुर्खाच्या नंदनवनात राहणारे टीका करतायेत. काँग्रेसच्या मतांवर निवडून आलो असतो तर मागील वेळी काँग्रेसचा १ खासदार निवडून आला होता. आता १३ खासदार निवडून आलेत. त्यामुळे मानसशास्त्रात याला आंबट गोड प्रतिक्रिया म्हणतात. काँग्रेसच्या मतांवर आम्ही निवडून आलो असं कुणी म्हणत असेल तर त्यांनी त्यांच्या उन्मादातच राहावे अशी टीका ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केली आहे.

अंबादास दानवे म्हणाले की,  आदित्य ठाकरेंनी कुठून लढायचं हे आम्ही ठरवू. तुम्हाला तुमच्या जागा निवडून आणण्यासाठी काय काय आटापिटा करावा लागला, किती नोटांचे खोके काढावे लागले. रात्री बेरात्री कोणाकोणाला भेटावे लागले, किती गुंडाची मदत घ्यावी लागली याचाही हिशोब द्यावा. भिवंडीतून लढा, वरळीतून लढा, कुठून लढायचे ते लढतील. महाराष्ट्र त्यांचा आहे. त्यामुळे सल्ले देण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्या जागा वाचवा. निव्वळ पैशाच्या ताकदीवर तुम्ही जिंकत असाल तर ही तुमची सूज आहे. ज्यादिवशी तुमचे पैसे संपतील तेव्हा कुत्रंही विचारणार नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच ज्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई प्रलंबित आहे. विधानसभा अध्यक्षांनी एकांगी भूमिका घेतली, सुप्रीम कोर्टात प्रलंबित असताना आमदारांना मतदानाचा अधिकार आहे का? उद्या यातून कुणी निवडून आले तर त्या ११ जणांचे भवितव्य काय? कायदेशीर सल्ला घेऊन विधान परिषदेच्या ११ जागांबाबत निर्णय घेऊ. महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही लढू. निवडणुकीला बराच काळ आहे उमेदवार कोण यावर चर्चा होईल असं दानवेंनी म्हटलं.

दरम्यान, माध्यमे एकांगी बाजूने भूमिका घेतो, नाना पटोलेंचा फोन घेतला नाही म्हणून माध्यमांनी हलकल्लोळ माजवला. आज महायुती पदवीधर, शिक्षक मतदारसंघात ३ उमेदवार आहेत. हे असतानाही प्रसार माध्यमे महायुती ३ बाजूला ३ ओढतायेत. रामदास कदम उघड उघड बोलतायेत. प्रकाश आंबेडकर यांना भाजपाची बी टीम अशाप्रकारेच लोक संबोधतात आणि ओळखतात. ते जर आमच्यासोबत असते तर निकालाचे चित्र आणखी वेगळे असते. भाजपाचे लोक बोलत होते, आम्हाला ४०० जागा द्या, घटना बदलायचीय. हिंदु राष्ट्र बनवू अशी विधाने भाजपा नेतेच करत होते. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना भाजपाला बदलायची आहे आणि अजूनही तेच मनसुबे आहेत असा आरोप अंबादास दानवेंनी भाजपावर केला. 

तुमचा उमेदवार नाही, जागा नाही...

काही बिनशर्ट पाठिंबा त्यावर टीका केली, तुमची एकही जागा नाही, तुमचा उमेदवार नाही. बरं, विधानसभेला तुम्ही २२५ जागा लढवणार बोलता, तुम्ही पाठिंबा ज्याला दिला होता त्याचं झालं काय? हा हिशोब दिला पाहिजे. उद्धव ठाकरेंनी कुणाचं नाव घेतलं नव्हतं. बिनशर्त पाठिंबा असे अनेक लोक देत असतात. त्यामुळे बिनशर्ट पाठिंबा म्हटले असतील असा खोचक टोला दानवेंनी राज ठाकरेंना लगावला. 
 

Web Title: "We will decide from where Aditya Thackeray will fight, - Ambadas Danve target Shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.