मिलेंगी ये ‘दर’ से हमे सरफराजी

By Admin | Published: August 28, 2016 01:53 AM2016-08-28T01:53:14+5:302016-08-28T01:53:14+5:30

हाजी अली दर्ग्यात यापुढे महिलांना प्रवेश मिळणार, असा महत्त्वपूर्ण निकाल शुक्रवारी उच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे या दर्ग्यात आता महिलांनाही जाता येणार आहे. त्यानिमित्त हा विशेष लेख.

We will meet Sarfarazi from this rate | मिलेंगी ये ‘दर’ से हमे सरफराजी

मिलेंगी ये ‘दर’ से हमे सरफराजी

googlenewsNext

- इरफान अली पिरजादे
(प्रासंगिक)

हाजी अली दर्ग्यात यापुढे महिलांना प्रवेश मिळणार, असा महत्त्वपूर्ण निकाल शुक्रवारी उच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे या दर्ग्यात आता महिलांनाही जाता येणार आहे. त्यानिमित्त हा विशेष लेख.

आमच्या सांगली गावातून माझ्या आईचा फोन आला़ मोठ्या आनंदाने ती सांगत होती की, हाजीअली (र.अ.) दर्ग्यामध्ये आता महिलांना प्रवेश मिळणार, कोर्टाचा निर्णय आलाय़ अशा कितीतरी महिलांना आनंद देणारा न्यायालयाचा निर्णय, प्रथमत: अशा प्रकारची न्यायालयीन लढा देणाऱ्या भारतीय मुस्लीम महिला आंदोलन संघटनेचे मन:पूर्वक आभार व अभिनंदन.
पाच-सहा वर्षांपूर्वी महिलांना दर्ग्यात जाण्यास मुभा होती, परंतु अचानक साक्षात्कार झालेल्या दर्ग्याच्या ट्रस्टींनी महिला प्रवेशबंदीचा वटहुकूम काढला़ अशा प्रकारच्या बुरसटलेल्या विचारांच्या व्यक्तींची निवड वेगवेगळ्या ट्रस्ट बोर्डावर आपल्या देशात पाहायला मिळते़, परंतु मुस्लीम समाजातील बोहरा व शिया जमातीमध्ये महिलांना त्यांच्या समाजाच्या दर्ग्यामध्ये प्रवेश आहे़ बोहरा समाजाच्या मशिदीमध्ये महिला-पुरुष एकाच मौलानांच्या मागे नमाज अदा करतात़
हजसाठी काबा शरीफमध्ये महिला-पुरुष एकाच ठिकाणी प्रार्थना करतात. अशा सर्वोच्च ठिकाणी हा भेदभाव नाही़, तसेच ह़ मोहम्मद पैगंबर (स़अ़स़) यांच्या मजहारीमध्येसुद्धा महिला-पुरुषांना जियारत (दर्शन) घेता येते़ अमेरिका, युरोपमध्ये काही मशिदींमध्ये मुख्य प्रवेशद्वार हे महिलांसाठी आरक्षित आहे़ पुरुषांसाठी अन्य दरवाजा आहे़ भारतातील विविध मुस्लीम दर्गा ट्रस्ट व बोर्डस्चे मेंबर काही विशिष्ट विचारसारणीच्या आहारी आहेत़ त्यांच्या विकासाची किंवा नगण्याची कल्पना मुख्य प्रवाहाला अनुसरून नाही़ भारत व आजूबाजूच्या मुस्लीमबहुल देशांमध्ये ‘इस्लाम’च्या शिकवणीचा उपयोग राजकीय विकासासाठी व पर्यायाने काहीच लोकांच्या आर्थिक विकासासाठी केला जातोय़ याची उदाहरणे आपल्या समोर गेली काही वर्षे सातत्याने हाजीअली ट्रस्टच्या रूपाने दिसत आहेत़
इस्लामच्या शिकवणीचा उपयोग सामाजिक विकासासाठी केलाय, असे आपल्याला दिसून येत नाही. किंबहुना, त्याचा वेग फारच कमी आहे़ ह. हाजीअली (ऱअ़) यांच्या संत मंडळींची समाजात जे कार्य करण्याची गती अशा ट्रस्टींनी किंवा बुरसटलेल्या मंडळींनी मिटवली आहे़ न्यायालयाच्या या निकालामुळे उङ्मेङ्मल्ल उ्र१ू’ी उङ्मीि ची चर्चा सुरू झाली पाहिजे़ मुस्लीम महिलांच्या न्याय हक्कासाठी झगडणाऱ्या मुस्लीम सत्यशोधक समाज, भारतीय मुस्लीम महिला आंदोलन, मुस्लीम राष्ट्रीय संत यांनी एकत्र येऊन मुस्लीम महिला न्याय हक्कासाठी लढा देत राहणे ही काळाची हाक आहे़ हाजीअली (ऱअ़) यांच्यावरील खालील आळी या कामासाठी प्रेरणादायी ठरतील़
खुदा आपने वलियोंसे होता है राजी,
मिलेंगी ये ‘दर’ से हमे सरफराजी
यहा दिल से मांगो ये हजी अली है,
खुदा के वली है...


(लेखक मुस्लीम राष्ट्रीय मंचचे राष्ट्रीय सहसंयोजक आहेत.)

Web Title: We will meet Sarfarazi from this rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.