Video : फी दरवाढ करणाऱ्या इंग्रजी शाळांवर कारवाई करू, शिक्षणमंत्र्यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 04:36 PM2020-03-03T16:36:34+5:302020-03-03T16:42:24+5:30
''ज्या शाळा कायद्याखाली आल्या नाहीत, त्या शाळांचा अहवाल तपासून, माहिती घेऊन कायद्याखाली
मुंबई - राज्यातील खासगी शाळा आणि विशेषत: इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये होणाऱ्या फी दरवाढीसंदर्भात आज विधानपरिषदेत प्रश्न विचारण्यात आला होता. याबाबत शालेय शिक्षणमंत्रीबच्चू कडू यांनी उत्तर देताना संबंधित शाळांवर कारवाई केली जाईल, आणि यापुढे असे होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिक्षण हक्क कायद्यानुसार अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी नोंदणी केली नाही. तसेच शाळांची मनमानी फी वाढ या विषयावर विधानपरिषद सभागृहात प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर बच्चू कडू यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलने उत्तर दिलंय.
''ज्या शाळा कायद्याखाली आल्या नाहीत, त्या शाळांचा अहवाल तपासून, माहिती घेऊन कायद्याखाली आणल्या जातील, असे शालेय शिक्षणमंत्री बच्चू कडू यांनी म्हटलंय. तसेच, शाळांमधील शुल्कवाढीसंदर्भात ज्या शाळा, संस्था पालन करत नाहीत, त्यांवर नवीन 2019 च्या सुधारणा कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करू. विशेष म्हणजे अशी कारवाई करण्यास अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा दाखवला, तर त्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करू, असे बच्चू कडू यांनी सांगितले. यानंतर असं होणार नाही, संस्थेनं शुल्क वाढवलं अन् कारवाई झाली नाही, असं होणार नाही, असे म्हणत विधानसभेतील प्रश्नाला कडू यांनी उत्तर दिले.
दरम्यान, इंग्रजी माध्यमांतील शाळांमध्ये सातत्याने फी वाढ होत असल्याचा आरोप पालकांकडून केला जातो. या फी दरवाढीविरोधात पालक अनेकदा रस्त्यावरही उतरल्याचे पाहायला मिळाले.