पोलिसांचे गणवेश सोलापुरातून पुरवण्याचा प्रयत्न करू
By admin | Published: January 4, 2017 02:41 AM2017-01-04T02:41:58+5:302017-01-04T02:41:58+5:30
देशभरातील सर्व पोलिसांना खाकी गणवेश पुरवण्याचे काम सोलापूरमधून आम्ही करू. त्यासाठी पंतप्रधानांनी सर्व राज्यांना सूचना द्याव्यात, अशी विनंती आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुंबई : देशभरातील सर्व पोलिसांना खाकी गणवेश पुरवण्याचे काम सोलापूरमधून आम्ही करू. त्यासाठी पंतप्रधानांनी सर्व राज्यांना सूचना द्याव्यात, अशी विनंती आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करणार आहोत, अशी माहिती राज्याचे वस्त्रोद्योग तसेच सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी येथे दिली.
ते म्हणाले की या उद्योगाला पाणी लागत नाही. प्रशिक्षणाद्वारे मनुष्यबळ उभे करता येईल. प्रशिक्षित कामगारांना किमान १० हजार रुपये मोबदला मिळू शकेल. देशभरातील पोलिसांना खाकी गणवेश सोलापूरमधून पुरवण्यासंदर्भात आपण पंतप्रधानांकडे पाठपुरावा करणार आहोत. या वेळी सोलापूर रेडिमेड कापड उद्योग संघाचे अध्यक्ष रामवल्लभ जाजू, सचिव अमित जैन, निमंत्रित सदस्य विजय डाकलिया, बँक आॅफ महाराष्ट्राचे विभागीय व्यवस्थापक सुनील हनमशेट आदी उपस्थित होते.
गणवेश उद्योगाचा आकार १८ हजार कोटींचा असून त्यातील १० हजार कोटी हे उत्पादक क्षेत्राकडून येतात. साधारण ८००० कोटी हे रिटेल विक्रेत्यांकडून आणि संस्थांकडून पुरविले जाणाऱ्या गणवेशांतून येतात.
या प्रदर्शनात ८२ स्टॉल्स असून, त्यात गारमेंटची उत्पादने असतील. गणवेश, स्त्री-पुरुषांचे कपडे,
टी-शर्ट, स्पोर्टस्चे कपडे
आदी उत्पादनांचा प्रदर्शनात समावेश राहणार आहे असल्याची माहिती सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघाचे उपाध्यक्ष नीलेश शहा यांनी सांगितले. (वाणिज्य प्रतिनिधी)
- भारतातील पहिले गणवेश आणि वस्त्र उत्पादकांचे तीन दिवसांचे प्रदर्शन महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये ५ ते ७ जानेवारी २०१७ या काळात होत असून, सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघाने या प्रदर्शनाचे यजमानपद स्वीकारले आहे.
त्याला राज्याच्या वस्त्रोद्योग विभागाचे सहकार्य मिळाले आहे. या प्रदर्शनाला देशातील ६ हजार रिटेलर्स भेट देणार आहे.
तसेच मेक इन इंडियाद्वारे सोलापुरात गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न आहे, असेही देशमुख म्हणाले.