Coronavirus : दर्शनाला येताना मास्क लावा; राज्यातील देवस्थानांचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 05:23 AM2022-12-24T05:23:18+5:302022-12-24T05:24:48+5:30

अनेक देवस्थानांकडून भाविकांना मास्क लावण्याचे  आवाहन करण्यात येत आहे. 

Wear a mask when visiting Appeal to the shrines in the state coronavirus india maharashtra | Coronavirus : दर्शनाला येताना मास्क लावा; राज्यातील देवस्थानांचे आवाहन 

Coronavirus : दर्शनाला येताना मास्क लावा; राज्यातील देवस्थानांचे आवाहन 

Next

मुंबई : चीनमध्ये कोरोनाची रुग्ण संख्या वाढू लागल्याने राज्यात अद्याप मास्कची सक्ती केली नसली तरी खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रातील अनेक देवस्थानांकडून भाविकांना मास्क लावण्याचे  आवाहन करण्यात येत आहे. 

कोल्हापूर, तुळजापूर, वणी, माहूरगड या शक्तिपीठांबरोबरच पंढरपूर, शिर्डी या देवस्थान समितीने भाविकांना मास्क लावण्याचे आवाहन केले आहे. भाविकही  त्याला प्रतिसाद देत असल्याचे दिसते. विनामास्क येणाऱ्यांना थांबवले जात आहे. 

बूस्टरसाठी नेजल व्हॅक्सिनला मंजुरी
नवी दिल्ली : भारत बायोटेकच्या इंट्रानेजल व्हॅक्सिनला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींना बूस्टर म्हणून ही लस घेता येईल. लसीकरणासाठी ‘को-विन’वर नोंदणी लवकरच सुरू होऊ शकते. या लसीसाठी सुईचा वापर केला जाणार नाही. ही लस नाकातून दिली जाणार आहे, तसेच खासगी हॉस्पिटलमध्येही ती उपलब्ध असणार आहे. 

लग्न समारंभ, सभा, आंतरराष्ट्रीय प्रवास टाळा 
लग्न समारंभ, राजकीय सभा, सामाजिक सभा तसेच आंतरराष्ट्रीय प्रवास टाळण्याचे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) केले आहे. कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी प्रिकॉशन डोस घेणे गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे, असे आयएमएने म्हटले. कोरोना रुग्ण वाढू नयेत यासाठी केंद्र सरकारही उपाय करत आहे. 

Web Title: Wear a mask when visiting Appeal to the shrines in the state coronavirus india maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.