विदर्भ, मराठवाड्यात पुढील आठवड्यात जादा पावसाची शक्यता, अतिवृष्टी नाही, हवामान विभागाचा अंदाजअतिवृष्टी नाही, हवामान विभागाचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2017 09:51 PM2017-10-03T21:51:44+5:302017-10-03T21:52:30+5:30
विदर्भ, मराठवाड्यात ६ ते १२ आॅक्टोबरदरम्यान सरासरीपेक्षा जादा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
पुणे : विदर्भ, मराठवाड्यात ६ ते १२ आॅक्टोबरदरम्यान सरासरीपेक्षा जादा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी मराठवाडा, विदर्भ व मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीची शक्यता काही हवामानतज्ञांनी वर्तवली आहे़ याकाळात कापणीयोग्य शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा, असे आवाहन त्यांनी केलेल्याचे वृत्त आहे़
याबाबत हवामान विभाग पुढील दोन आठवड्यांचा अंदाज जाहीर करीत असते़ त्यानुसार विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ६ ते १२ आॅक्टोंबर या काळात जादा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे़ मात्र, त्यात अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आलेली नाही़ सप्टेंबरमध्ये मान्सूनच्या परतीचा पाऊस सुरु होतो़ त्यामुळे या काळात पाऊसमान कमी असते़ त्यानुसार विदर्भात या आठवड्यात सरासरी १६़४ मिमी पाऊस पडतो़ त्यापेक्षा २७ टक्के जादा पाऊस होईल़ मराठवाड्यात या आठवड्यात सरासरी १६़२ मिमी पाऊस पडतो़ त्यापेक्षा ३६ टक्के जादा पाऊस होण्याची शक्यता आहे़ तसेच मध्य महाराष्ट्रात सरासरी २०़८ मिमी पाऊस होतो, त्यापेक्षा ४ टक्के अधिक पाऊस होऊ शकतो़ कोकणात मात्र, सरासरीच्या १५ टक्के कमी पाऊस होऊ शकतो़ असे या अंदाजात म्हटले आहे़
६ ते १२ आॅक्टोंबर दरम्यान पडणाºया पावसाचा अंदाज (मिमी)
विभाग सरासरी प्रत्यक्ष (टक्केवारी)
विदर्भ १६़४ +२७
मराठवाडा १६़२ +३६
मध्य महाराष्ट्र २०़८ +४
कोकण २४़६ -१५