Weather: ‘या’ ढगांचा थर साचून पडताेय कमालीचा पाऊस, आकाश क्युम्युलोनिंबस ढगांनी वेढले

By श्रीकिशन काळे | Published: April 16, 2023 01:43 PM2023-04-16T13:43:35+5:302023-04-16T13:44:13+5:30

Weather Update: दिवसा अंगाची लाही लाही आणि सायंकाळी वरुणराजाची बरसात, असे चित्र मागील काही दिवसांपासून सुरू आहे. हा अनुभव क्युम्युलोनिंबस या ढगांमुळे मिळत आहे.

Weather: 'Ya' layer of clouds accumulates heavy rain, sky covered with cumulonimbus clouds | Weather: ‘या’ ढगांचा थर साचून पडताेय कमालीचा पाऊस, आकाश क्युम्युलोनिंबस ढगांनी वेढले

Weather: ‘या’ ढगांचा थर साचून पडताेय कमालीचा पाऊस, आकाश क्युम्युलोनिंबस ढगांनी वेढले

googlenewsNext

- श्रीकिशन काळे 
पुणे : दिवसा अंगाची लाही लाही आणि सायंकाळी वरुणराजाची बरसात, असे चित्र मागील काही दिवसांपासून सुरू आहे. हा अनुभव क्युम्युलोनिंबस या ढगांमुळे मिळत आहे. या ढगांची भली मोठी उंच इमारत आकाशात साकारते त्याने कमी वेळेत अधिक पाऊस पडण्याची किमया होते. विध्वंसक ढग म्हणून याची ओळख आहे.

आकाशात वेगवेगळ्या उंचीवर क्युम्युलोनिंबस ढग असतात. सिरस प्रकारचे ढग वरच्या ढगांत मोडतात. आकाशात सर्वात उंच हेच ढग दिसतात. मध्यम उंचीच्या क्युम्युलस ढगाला आल्ट्रोक्युम्युलस म्हणतात. मध्यम उंचीच्या स्ट्रॅटस ढगाला आल्ट्रोस्टॅट्रस म्हणतात. आपल्या देशातील माॅन्सूनचे ढग याच प्रकारचे असतात. क्युम्युलस १५०० मीटर, क्युम्युलोनिंबस ४००० तर सिरस ढग १५०००  मीटर उंचीवर असतात. निम्बस प्रकारचे ढग दाट आणि भुऱ्या रंगाचे असून ते पाऊस देतात.

‘क्युम्युलोनिंबस’ची वैशिष्ट्ये काय? 
विपरीत हवामानाचा ढग एकमेव तो म्हणजे क्युम्युलोनिंबस आहे. काही मिनिटांत त्याचा उंच मनोरा तयार होतो. त्याचा तळ जमिनीवरून एक-दाेन किमी असला तरी त्याचे वरचे टोक १२-१३ किमीपर्यंत किंवा त्याहून वरपर्यंत जाते.   

क्युम्युलोनिंबस हा एक वादळी मेघ आहे. त्यातील विजेचा लखलखाट दूरपर्यंत दिसतो. जमिनीवर वीज कोसळते ती याच ढगांतून. या ढगांचा जीवनकाळ अर्धा तास किंवा एक तास असतो. तेवढ्यात मुसळधार पाऊस येतो. वादळी वारे येतात.
- डॉ. रंजन केळकर
माजी महासंचालक, 
भारतीय हवामानशास्त्र विभाग  

Web Title: Weather: 'Ya' layer of clouds accumulates heavy rain, sky covered with cumulonimbus clouds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.