वाई मतदारसंघातील तेरा मतदानकेंद्रे ‘लाईव्ह’ जिल्ह्यात पहिल्यांदाच ‘वेबकास्टिंग’ :

By admin | Published: October 14, 2014 10:31 PM2014-10-14T22:31:57+5:302014-10-14T23:18:53+5:30

संभाव्य गैरप्रकारांवर राहणार देखरेख; ‘यू-ट्यूब’वरही पाहता येणार

'Webcasting' for the first time in LIVE district, thirteen polling stations in Y's constituency. | वाई मतदारसंघातील तेरा मतदानकेंद्रे ‘लाईव्ह’ जिल्ह्यात पहिल्यांदाच ‘वेबकास्टिंग’ :

वाई मतदारसंघातील तेरा मतदानकेंद्रे ‘लाईव्ह’ जिल्ह्यात पहिल्यांदाच ‘वेबकास्टिंग’ :

Next

 मोहन मस्कर-पाटील - सातारा: जगभरातील कोणत्याही व्यक्तीला आता एका क्लिकवर वाई विधानसभा मतदारसंघातील तेरा मतदानकेंद्रांवर दिवसभरात होणाऱ्या घडामोडी पाहता येणार आहेत. जिल्हा प्रशासनाने या मतदानकेंद्रांवर ‘वेबकास्टिंग’ ही अभिनव संकल्पना राबविल्यामुळे संपूर्ण घटनाक्रम ‘लाईव्ह’ आहे. विशेष म्हणजे मतदान झाल्यानंतर कोणत्याही दिवशी संबंधित संकेतस्थळावर गेले असता त्याची चित्रफीत आपल्याला पाहता येणार आहे. ‘यू ट्यूब’वरही ती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ‘वेबकास्टिंग’ संकल्पना पुढे आली. महाराष्ट्रात यवतमाळ आणि अकोला येथे काही मतदानकेंद्रावर ‘वेबकास्टिंग’ झाले. त्याचे सकारात्मक परिणामही दिसून आले. मतदानकेंद्रावरील कर्मचाऱ्यांचे वर्तन, संवादप्रक्रिया यानिमित्ताने अभ्यासली गेली. त्याचा सकारात्मक परिणाम झाला. परिणामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील काही जिल्ह्यात ‘वेबकास्टिंग’ची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोणत्याही निवडणुकीत अनेकदा मतदान केंद्र ताब्यात घेणे, मतदारांना धमकावण्याचा प्रयत्न होतो. काहीदा अधिकारी त्यांना सहकार्य करत असल्याचे आरोप होतात. परिणामी एकाच उमेदवाराला अधिक मतदान होत असल्याची बाब लपून राहिली नाही. त्याला अटकाव घालण्यासाठी ‘वेबकास्टिंग’ उपयुक्त ठरणार आहे. कोणताही मतदार मतदानकेंद्रात आला की तो मतदान करून बाहेर पडेपर्यंत त्याची छबी वेबकॅमेऱ्यात कैद होणार आहे. फक्त संबंधित मतदार कोणाला मतदान करतोय, याची छबी मात्र टिपली जाणार नाही. तेवढी दखल ‘राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र’ तथा ‘एनआयसी’ने घेतली आहे. मतदान केंद्रावर नियुक्त क्षेत्रीय अधिकारी, केंद्राधिकारी आदींना ‘वेबकास्टिंग’मुळे कार्यपध्दतीत बदल करावा लागणार आहे. ‘पोलिंग एजंटां’ची कार्यपध्दतीही या यंत्रणेद्वारे कॅमेऱ्यात कैद होणार आहे. ‘राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र’ तथा ‘एनआयसी’तून मिळालेल्या माहितीनूसार, वाई विधानसभा मतदारसंघात जी अकरा मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत तेथे ‘वेबकॅमेरे’ कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यासाठी आवश्यक असणारी यंत्रसामग्रीही बसविण्यात आली आहे. यासाठी ‘जी-मेल’, ‘यू-ट्यूब’ आदी संपर्कमाध्यमांचे सहकार्य घेण्यात आले आहे असून ‘ट्रायल’ही यशस्वी ठरली. यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण ‘संग्राम’च्या कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. असे पाहता येईल ‘वेबकास्टिंग’ सातारा जिल्हा प्रशासनाचे संकेतस्थळ ‘राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र’ तथा ‘एनआयसी’ने तयार केले आहे. जिल्ह्याच्या संकेतस्थळाचा पत्ता ६६६.२ं३ं१ं.ल्ल्रू.्रल्ल असा आहे. हे संकेतस्थळ सुरू केल्यानतंर उजव्या बाजूला ‘मतदान केंद्राचे वेबकास्ट-सराव चाचणी’ नामक लिंक देण्यात आली आहे. त्यावर ‘क्लिक’ केले की, ँ३३स्र://६६६.२ं३ं१ं.ल्ल्रू.्रल्ल/ँ३े’ङ्मिू२/६ीुूं२३_२ं३ं१ं.ँ३े लिंक ओपन होते. त्यानंतर ज्या मतदान केंद्रावर वेबकास्टिंग आहे, त्याचे क्रमांक तेथे देण्यात आले आहेत. त्यावर क्लिक केले की मतदानकेंद्रात नेमके काय चालले आहे, त्याची माहिती जगभरात कोणालाही पाहता येणार आहे. सातारा १३ तर सोलापूर ११0 पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, सातारा या दोन जिल्ह्यात काही मतदारसंघात काही विधानसभा मतदारसंघात ‘वेबकास्टिंग’ करण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यात फक्त वाई विधानसभा मतदारसंघातील तेरा मतदानकेंद्रावर ‘वेबकास्टिंग’ होणार आहे. सोलापूर जिल्ह्यात मात्र प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दहा अशा ११0 केंद्रात ‘वेबकास्टिंग’ होणार आहे. या मतदानकेंद्रावर होणार ‘वेबकास्टिंग’ केंद्र क्रमांकमतदान केंद्राचे नाव ८जि. प. शाळा, शिंदेवाडी १७जि. प. शाळा, शिरवळ ६३जि. प. शाळा, लोणंद १0६जि. प. शाळा, आसवली ११६जि. प. शाळा, खंडाळा १५८जि. प. शाळा, शेंदूरजणे १९१जि. प. शाळा, बोरगाव २२५न. पा. शाळा, वाई २४६जि. प. शाळा, ओझर्डे २७0जि. प. शाळा, भुर्इंज २७४जि. प. शाळा, भुर्इंज ३0३जि. प. शाळा, बावधन ३२५मीनलबेन मेहता कॉलेज, पाचगणी

Web Title: 'Webcasting' for the first time in LIVE district, thirteen polling stations in Y's constituency.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.