संकेतस्थळ हॅक नाही

By admin | Published: May 20, 2014 03:32 AM2014-05-20T03:32:50+5:302014-05-20T03:32:50+5:30

मुंबई विद्यापीठाचे संकेतस्थळ पाकिस्तानच्या ब्लेझिंग हॅकर्सने हॅक केल्याचे वृत्त मुंबई विद्यापीठाने सोमवारी फेटाळले आहे.

Website Hack Not Found | संकेतस्थळ हॅक नाही

संकेतस्थळ हॅक नाही

Next

मुंबई : मुंबई विद्यापीठाचे संकेतस्थळ पाकिस्तानच्या ब्लेझिंग हॅकर्सने हॅक केल्याचे वृत्त मुंबई विद्यापीठाने सोमवारी फेटाळले आहे. राजकारणाचे धडे देणार्‍या भारतीय छात्र संसदची विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील हायपर लिंक हॅक झाल्याचे विद्यापीठाच्या संगणक विभागाचे प्रमुख मोहन कुमार यांनी स्पष्ट केले आहे. मुंबई विद्यापीठाचे संकेतस्थळ पाकिस्तानी ब्लेझिंग हॅकर्स यांनी हॅक केल्याचे रविवारी रात्री उघडकीस आले. या हॅकर्सने राजकारणाचे धडे देणार्‍या भारतीय छात्र संसदचे संकेतस्थळ हॅक करत भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना धमकी दिली आहे. पाकिस्तानचे तुम्ही काहीच बिघडवू शकत नाही, असे हॅकर्सनी संदेशात मोदी यांना उद्देशून म्हटले होते. सहा महिन्यांमध्ये पाकिस्तानचे नामोनिशाण मिटवून पाकिस्तानमध्ये गुप्त मोहीम राबविणार असल्याचे ऐकले आहे. पण मोदीजी प्रथम तुम्ही स्वत:ला सुरक्षित करा, असा इशारा या संदेशात देण्यात आला होता. मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर शिक्षणासंदर्भातील अनेक हायपर लिंक उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या हायपर लिंकमध्ये भारतीय छात्र संसदच्या संकेतस्थळाची लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, रविवारी रात्री हे संकेतस्थळ हॅक करून त्यामध्ये मोदी यांना उद्देशून इशारा देण्यात आला होता. हा प्रकार विद्यापीठ प्रशासनाच्या लक्षात येताच त्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील लिंक तातडीने डीलीट केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Website Hack Not Found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.