लग्नातून 'घोडीनेच' काढला पळ...

By admin | Published: June 26, 2015 01:22 PM2015-06-26T13:22:34+5:302015-06-26T14:44:59+5:30

लग्नाच्या मंडपातून 'वर' किंवा 'वधू' पळून गेल्याची बातमी तुम्ही अनेकवेळा ऐकली असेल मात्र लग्नाच्या मंडपातून एका घोडीनेच पळ काढल्याची घटना मुंबईत घडली.

The wedding took place with 'Ghodei se' ... | लग्नातून 'घोडीनेच' काढला पळ...

लग्नातून 'घोडीनेच' काढला पळ...

Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ -  लग्नाच्या मंडपातून 'वर' किंवा 'वधू' पळून गेल्याची बातमी तुम्ही अनेकवेळा ऐकली असेल मात्र लग्नाच्या मंडपातून एका घोडीनेच पळ काढल्याची घटना मुंबईत घडली. 
 'पायल' या चार वर्षीय घोडीला बांद्रा येथे २३ एप्रिल रोजी एका लग्नासाठी नेले जात होते, मात्र त्याचवेळी कचरा गोळा करणारा एक ट्रक त्यांच्या मागे येत होता, ट्रकच्या हॉर्नमुळे बिथरलेल्या पायलला तिच्या  घोडेस्वाराने शांत केले व ते पुढे जाऊ लागले. मात्र काही वेळानंतर तो ट्रक खड्ड्यात आदळल्यामुळे झालेल्या मोठ्या आवाजामुळे पायल पुन्हा बिथरली आणि तिने तिच्या घोडेस्वाराला खाली फेकून दिले व तेथून पळ काढला. 
दुपारी पावणेचारच्या सुमारास पळालेल्या पायलने वांद्रे-वरळी सी लिंक गाठत तब्बल ४१३ फुटांचा प्रवास केला. सी-लिंकवरील हजारो वाहनांसोबतच एक घोडी पळताना पाहून प्रवाशांच्या भुवया उंचावल्या होत्या, टोलनाक्यावरील कर्मचारी व प्रवासीही तिला पाहून चक्रावले. मात्र तिला थांबवायचे कसे हा प्रश्न त्यांना पडला. काही प्रवाशांनी पोलिस कंट्रोल रूमला फोन करून या घटनेची माहिती दिली आणि तिला थांबवण्यासाठी पोलिसांनी तिच्या मागे धाव घेतली. मात्र पायलनेत संपूर्ण सी-लिंक पार करेपर्यंत तिला न पकडण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. कारणतसे केल्यास ती आणखी बिथरून आजूबाजूच्या वाहनांना धडकून जखमी होण्याची वा वाहनांना नुकसान पोहोचवण्याची शक्यता होती. किंवा घाबरल्यामुळे ती समुद्रात उडी टाकेल अशी भीतीही पोलिसांना होती. अखेर थोड्या वेळाने काही इस्रायली नागरिकांनी तिला पकडून शांत करण्यात व रस्त्याच्या बाजूस नेण्यात यश मिळवले. त्यानंतर पायलची रवानगी पशुसंवर्धनगृहात करण्यात आली.

 

Web Title: The wedding took place with 'Ghodei se' ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.